इस्रायली हॅकर्सनी इराणच्या सरकारी आयआरआयबी टीव्हीसह अनेक न्यूज चॅनेल हॅक केले. यानंतर २०२२ महिलांनी केस कापून सरकारचा केलेल्‍या निदर्शनांचे व्हिडिओ प्रसारी केले.  (Image source- X)
राष्ट्रीय

Iran Israel war : इस्रायली हॅकर्सनी इराणी न्यूज चॅनेल केले हॅक, महिलांच्या निदर्शनांचे फुटेज प्रसारित

इराणमधील नागरिकांना केले सरकारविरोधात बंडाचे आवाहन 2022च्‍या निदर्शनांचे व्‍हिडिओ दाखवले

पुढारी वृत्तसेवा

Iran Israel war : इस्रायल व इराणमधील हवाई संघर्ष आज (दि. १९ जून) सलग सातव्‍या दिवशीही कायम राहिला आहे. बुधवारी (१८ जून) रात्री उशिरा इस्रायली हॅकर्सनी इराणच्या सरकारी आयआरआयबी टीव्हीसह अनेक न्यूज चॅनेल हॅक केले, अशी माहिती इराणमधील स्‍थानिक माध्‍यमांनी दिली. हॅकर्संनी इराणमधील नागरिकांना सरकारविरोधात बंडाचे आवाहन करत इराणमधील महिलांनी २०२२मध्‍ये केस कापून केलेल्‍या निदर्शनांचे व्हिडिओ प्रसारीत केले.

इराणमधील हमशहरी दैनिकाने त्‍यांच्‍या टेलिग्राम चॅनेलवर अल्पकालीन व्यत्ययाचा व्हिडिओ शेअर केला. त्‍यांनी म्‍हटले की, हॅकर्सनी सरकारी टीव्‍हीसह अनेक न्‍यूज चॅनेल हॅक केली आहेत. तसेच इराणमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरण्यास आवाहन करणारे कॉल प्रसारित केले आहेत. उपग्रह प्रसारणात व्यत्यय आणत इस्‍त्रालयने टीव्‍ही चॅनेलवर सायबर हल्‍ला केला, असे इराणच्या सरकारी टीव्‍ही चॅनेलने म्‍हटले आहे. इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते जोनाथन हारुनोफ यांनीही टेलिव्हिजनवरील व्यत्ययाची एक क्लिप शेअर केली. या क्लिपमध्ये २०२२ मध्ये देशाच्या नैतिकता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महसा अमिनी या महिलेच्या मृत्यूनंतर सरकारविरुद्ध झालेल्या मोठ्या प्रमाणात निदर्शनांचे फुटेज असल्याचे दिसून येते.

इराणमध्‍ये २०२२ मध्‍ये काय घडलं होतं?

२०२२ मध्ये महसा अमिनी या महिलेला पद्धतीने हिजाब परिधान केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तिचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण इराणमध्‍ये संतापाची लाट उसळली. सरकारविरोधात महिलांना तीव्र निदर्शने केली. काही महिलांनी रस्‍त्‍यावर उतरुन केस कापत सरकारचा निषेध केला होता. या प्रकरणाती दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

अमेरिकेचा पुन्‍हा एकदा इराणला इशारा

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याच्या नियोजनाला मान्यता दिली आहे. आता फक्त ट्रम्प यांच्या अंतिम आदेशाची वाट पाहत आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मधील वृत्तानुसार इराण अणुकार्यक्रमाबाबत धोरण बदलले नाही तर अमेरिका इराणवर हल्‍ला करण्‍याच्‍या तयारीत आहे. इराणने पूर्णपणे शरणागती पत्‍करावी, अन्‍यथा गंभीर परिणामा तोंड द्‍यावा लागेल, असा इशारा ट्रम्‍प यांनी दिला आहे.

इराणमधील मृतांची संख्‍या ६३९ वर, १३२९ जखमी

गेल्या ६ दिवसांत या युद्धात २४ इस्रायली मारले गेले आहेत. त्याच वेळी, अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील 'ह्युमन राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स' या मानवाधिकार संस्‍थेने दावा केला आहे की, इराणमध्ये मृतांची संख्या आता 639 वर पोहोचली आहे. तसेच इस्‍त्रायलच्‍या हल्‍ल्‍यात 1329 लोक जखमी झाले आहेत. मृतांपैकी २६३ नागरिक असून, १५४ जण सुरक्षा दलांशी संबंधित होते. इराणी सरकार या संघर्षात मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येबद्दल नियमितपणे माहिती देत ​​नाही आणि यापूर्वी अनेक वेळा कमी संख्या देण्यात आली आहे. यापूर्वी, सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात मृतांची संख्या २२४ असल्याचे नोंदवण्यात आले होते.

अमेरिकेने इराणच्या हद्दीत येणारी जहाजे हटवली 

अमेरिकेने पश्चिम आशियात तैनात केलेल्या त्यांच्या काही लष्करी जहाजे आणि विमानांना त्यांच्या ठिकाणाहून हटवण्यास सुरुवात केली आहे. ही जहाजे इराणच्या हद्दीत होती आणि त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी 'रॉयटर्स'ला सांगितले की, अमेरिकन सैन्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकन नौदलाची जहाजे बहरीनच्या बंदरातून काढून टाकण्यात आली आहेत जिथे यूएस 5 व्या नौदल ताफ्याला तैनात केले आहे. त्याच वेळी, ती विमाने कतारच्या अल उदेद एअरबेसवरून देखील हटवली आहेत.

इराणमध्‍ये इंटरनेटवर तात्पुरती बंदी

इराणच्या दळणवळण मंत्रालयाने जाहीर केले आहे की इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान आपल्या नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी इंटरनेटवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी, लंडनस्थित इंटरनेट देखरेख संस्था नेटब्लॉक्सने दावा केला होता की इराणमध्ये जवळजवळ संपूर्ण राष्ट्रीय इंटरनेट ब्लॅकआउट आहे.

इराणमध्‍ये ६ दिवसांत ११०० हून अधिक ठिकाणी हल्‍ला

इस्रायल संरक्षण दलाचे (आयडीएफ) प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, इस्रायली हवाई दलाने ६ दिवसांत इराणमधील ११०० हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केला आहे. ते म्हणाले, 'आम्ही अणु धोक्याला निष्प्रभ करण्यासाठी योग्‍यरित्‍या काम करत आहोत. आमच्या हल्ल्यांमुळे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालींचे बरेच नुकसान झाल्‍याचा दावाही त्‍यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT