Israel-Iran War | 'भारतीयांनो, तात्काळ तेहरान शहर सोडा'

इराण-इस्रायल संघर्षाच्‍या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने जारी केली नवीन सूचना
Iran vs Israel war-ayatollah khomeini -benjamin netanyahu
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari photo
Published on
Updated on

Israel-Iran War | इस्‍त्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर होणार्‍या हवाई हल्‍ल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर आज (दि.१७) भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ शहर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. तसेच तेहरानमधून बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था होईपर्यंत त्यांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्यास आणि सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे.

इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, सर्व भारतीय नागरिकांना तेहरान शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने तेहरानमध्ये असलेल्या आणि दूतावासाच्या संपर्कात नसलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ दूतावासाशी संपर्क साधून त्यांचे स्थान आणि संपर्क क्रमांक देण्याची विनंती केली आहे. संपर्क क्रमांक +989010144557, +989128109115 आणि +989128109109 असल्‍याचेही निवेदनात नमूद केले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची प्रक्रिया सुरू

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या लष्करी तणावादरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सध्या तीन विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यात १५०० काश्मिरी आहेत. बहुतेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी तेथे वास्‍तव्‍यास आहेत.

Iran vs Israel war-ayatollah khomeini -benjamin netanyahu
Gold Rate Hike | इराण- इस्त्रायल संघर्षात 'सोने' भडकले

विद्यार्थ्यांना आर्मेनिया मार्गे भारतात परत आणले जाणार

इराणमध्‍ये अडकलेल्या 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे सुनिश्चित करण्यासाठी भारताने इराणला आवाहन केले होते. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या जमिनीच्या सीमेवरून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार , इराणचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्मेनिया मार्गे बाहेर काढले जात आहे. आर्मेनियातील विद्यार्थ्यांना जॉर्जिया आणि नंतर पश्चिम आशिया मार्गे भारतात आणता येईल. ११० विद्यार्थ्यांचा पहिला गट आर्मेनिया सीमेवर पोहोचला आहे. यापूर्वी, भारतीय दूतावासाने सोमवारी तेहरानमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती.

Iran vs Israel war-ayatollah khomeini -benjamin netanyahu
Iran US nuclear talks | अमेरिका-इराण युद्ध भडकणार? अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ल्याची इराणची धमकी...

इस्राएल-इराणमध्‍ये सलग पाचव्‍या दिवशी हल्‍ले-प्रतिहल्‍ले

मंगळवार सलग पाचव्या दिवशी इस्रायल आणि इराणमध्ये हल्‍ले-प्रतिहल्‍ले सुरुच राहिले. इराणने दावा केला आहे की, मागील पाच दिवस इस्‍त्रायलने केलेल्‍या हल्‍ल्‍यात २२४ नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. तर र इस्रायलने 24 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. सुमारे 3,000 इस्रायलींना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्‍यान,जी७ शिखर परिषद अर्धवट सोडणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावाचा आढावा घेण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा कक्षाची बैठक घेतली. तसेच इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही. प्रत्येकाने ताबडतोब तेहरान रिकामे करावे," असे आवाहनही त्‍यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news