

Israel-Iran War | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प G7 परिषदेसाठी कॅनडाला पोहोचले होते, परंतु इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे ट्रम्प एक दिवस आधीच परतत आहेत, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे. मला लवकर परतावे लागणार आहे. कारण स्पष्ट आहेत,” असे ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ट्रम्प यांनी उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांचे पश्चिम आशियातील विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांना इराणशी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेतदरम्यान, सर्व लोकांनी त्वरित तेहरान (इराणची राजधानी) सोडून द्यावी, असा इशाराही त्यांनी इराणला दिला आहे.
व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन यांनीएक्स पोस्ट करत म्हटलं की, मध्य पूर्वेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष ट्रम्प आज रात्री निघणार आहेत.दरम्यान, सोमवारी एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायल-इराण संघर्ष निवळवण्यासाठी G7 देशांनी तयार केलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करणार नाहीत.तरीही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांचे लवकर निघणे सकारात्मक असल्याचे म्हटले आहे, कारण मध्य पूर्वेत युद्धविराम मिळवणे हे उद्दिष्ट आहे. मॅक्रॉन यांनी सांगितले की ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविरामासाठी एक प्रस्ताव दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी इराणला अणुकरारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. त्यांनी 'करारावर' स्वाक्षरी करायला हवी होती. त्यांच्या कृतीमुळे संपूर्ण मानवतेला धोका निर्माण झाला आहे. इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत. मी हे वारंवार सांगितले आहे. तसेच, भविष्यात आणखी मोठा हल्ल्यांचे संकेत देत ट्रम्प नागरिकांनी तेहरान सोडावे, असा इशारा इराणला दिला आहे.
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष पाचव्या दिवशीही सुरू राहिला. सोमवारी रात्री इस्रायलने तेहरानवर अनेक वेळा हवाई हल्ले केले. त्याच वेळी, इस्रायलने इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि हैफा येथे बॉम्बहल्ला केला. इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत २२४ इराणी नागरिक ठार झाले आहेत, तर १,४८१ लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, इस्रायलमध्ये आतापर्यंत २४ लोक मारले गेले आहेत, तर ६०० हून अधिक जखमी झाले आहेत.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सोमवारी फॉक्स न्यूज दिलेला मुलाखतीत सांगितले की,इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असतानाही अध्यक्ष ट्रम्प इराणसोबत अणुकरार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने हे स्पष्ट केले की, सध्या अमेरिका इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करणार नाही.