राष्ट्रीय

चाट पापडी विकणारे गौरव गुप्ता दिसतात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे!

backup backup

मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथील गौरव गुप्ता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गुप्ताजी यांचा ग्वाल्हेर मध्ये चाट पापडीचा छोटासा व्यवसाय आहे. गौरव गुप्ता हुबेहुब दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( arvind kejriwal ) यांच्यासारखे दिसत आहेत. म्हणून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यांचे ग्राहक गुप्ता यांना केजरीवाल या नावाने बोलवतात. आता हे गुप्ताजी अरविंद केजरीवाल यांच्यासारखी टोपीही परिधान करतात. त्यांचे ग्राहक सरकारी कर्मचारी आहेत.

गुप्ता आपल्या बाईकवर चाटचे दुकान लावतात. ते बॉक्समध्ये चाट पापडी विकतात. दररोज ते १२ च्या सुमारास दुकान सुरु करतात. गौरव गुप्ता कार्यालयीन वेळेपर्यंत चाट पापडी विकतात. ग्वाल्हेर मध्ये सरकारी कार्यालये मोती महाल जवळ आहेत. गुप्ता यांचे ग्राहक हे सरकारी कर्मचारी आहेत.

चाट पापडी विकणारे गुप्ता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासारखे दिसतात. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची चर्चा जोरात आहे. ग्वाल्हेरचे लोक आता त्यांना अरविंद केजरीवाल नावाने बोलवतात.आणि त्यांच्याशी विनोद करतात. त्यांचे ग्राहक त्यांना मफलरही लावण्याचा आग्रह करतात.

गौरव गुप्ता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटम्याची ईच्छा व्यक्त केली आहे. गौरव गुप्ता मोती महल बेजातल समोर चाटचे दुकान लावतात. ते समोसे आणि गुलाब जामुनही विकतात. ग्राहक त्यांचे समोसे आणि गुलाब जामुन खाण्यासाठी दुरून येतात.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT