corona unlock: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी | पुढारी

corona unlock: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : corona unlock : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जनतेसाठी आणि उदोजकांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने कोरोना निर्बंध आणखी सैल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यापूर्वीच 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंत आता उपाहारगृहे व दुकानांनाही वेळा वाढवून देण्यात आल्या आहेत.


राज्य आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने जात आहे. राज्यात याआधी हॉटेल्स,रेस्टॉरंट्स १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी होती. आता टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स १२ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसंच, सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अम्युझमेंट पार्क देखील खुली होणार..

अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील कर्मचारी तसंच ग्राहकांचं लसीकरण आवश्यक आहे. फेस मास्क तसंच, सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे.

Back to top button