mandira bedi 
Latest

Mandira bedi : नवऱ्याचं नुकतंच निधन झालंय अन् हा नवा कोण?, मंदिरा बेदी ट्रोल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने एका मित्रासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये मंदिरा अतिशय हॉट बिकिनीमध्ये दिसत आहे. आता मंदिराचा हा फोटो पाहून ट्रोलर्स तिला ट्रोल करत आहेत. मंदिराचे पती राज कौशल यांचे गेल्या वर्षी निधन झाले. राज यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. आता मंदिरा पुन्हा आपले जीवन स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करीत आहे.  (Mandira)

मंदिराने तिच्या मित्रासोबतचा फोटो शेअर केला आहे. मंदिराने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा इ. हा फोटो सर्व काही सांगतो की, तुम्ही माझ्यासाठी काय आहात. आम्ही एकमेकांना किती वर्षांपासून ओळखतो, आमचे समीकरण काय आहे आणि माझा तुमच्यावर किती विश्वास आहे. देव तुम्हाला खूप आनंदी ठेवो आणि यशस्वी. वयाच्या १७व्या वर्षापासून तू माझा मित्र आहेस. तुझ्यावर प्रेम करते." (Happy Birthday Adi. This photograph says it all. What you mean to me. How long we have know each other. What our equation is. And how much I trust you (to do this in #covidtimes ?) #sumsitup ❣️❤️ May more happiness, love and success find it's way to you. Love you, my dearest friend from the age of 17! @adimots ?❤️)

तिने पुलमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मित्रासोबत दिसत आहे. तिच्या मित्राचे नाव आदी आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामला फोटो शेअर करत ही पुढील कॅप्शन लिहिलीय. त्याचसोबत आदीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मंदिरा ट्रोल

मंदिराची पोस्ट पाहून ती ट्रोल होत आहे. एका ट्रोलरने लिहिले की, हा फोटो तुमची निष्ठा आणि स्वच्छता दोन्ही तोडत आहे. दुसरा ट्रोलर म्हणाला, "हा तुझा नवरा आहे का?" तिसर्‍याने लिहिले की, "तुझ्या नवऱ्याचे नुकतेच निधन झाले, हा कोण आहे?" आणखी एकाने लिहिले की, "यार, तिच्या नवऱ्याचे काही वेळापूर्वी निधन झाले होते आणि ती खूप दुःखी होती. मग आता हे काय आहे?"

मंदिरा आणि राज यांचा विवाह १४ फेब्रुवारी १९९९ रोजी झाला होता. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट १९९६ मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा ऑडिशनसाठी तिथे पोहोचली होती आणि राज मुकुल आनंदचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. येथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मंदिरा आणि राजने तीन वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मंदिराचे पालक तिच्या निर्णयावर खूश नव्हते.

मंदिराचे पती राज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज त्यावेळी ४९ वर्षांचे होते. राज यांना पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातचं त्यांचे निधन झाले. राज यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती. यानंतर त्यांनी आपल्या करिअरमध्ये 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT