सांगली : एसटीचे चाक रुळावर : उत्पन्‍न 65 लाख | पुढारी

सांगली : एसटीचे चाक रुळावर : उत्पन्‍न 65 लाख

सांगली : पुढारी वृत्तसेवा
एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी चार महिने कर्मचार्‍यांनी संप केला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात दररोज 614 गाड्या 2 हजार 750 फेर्‍या मारत आहेत. जिल्ह्यात 85 टक्के वाहतूक सुरू झाली आहे.

दरम्यान, शाळा, महाविद्यालय बंद असल्याने ग्रामीण भागातील केवळ 15 टक्के वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सांगली आगारातून सध्या दररोज 434 गाड्यांच्या फेर्‍या होत आहेत. मिरज आगारातून 281, इस्लामपूर 368, तासगाव 255, कवठेमहांकाळ 215, आटपाडी 168, जत 222, पलूस 160, शिराळा 210 आणि विटा आगारातून 406 अशा 614 गाड्या 2 हजार 750 फेर्‍या मारत आहेत.

दररोज 2 लाख 15 हजार किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. यामधून सरासरी प्रतिदिन 1 लाख 20 हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. तर दररोज सरासरी 65 लाख उत्पन्न एसटीला मिळत आहे. यामुळे प्रवासी आणि कर्मचार्‍यांतून आनंद व्यक्‍त होत आहे. सांगली आगारातून पुणे, मुंबई, नाशिक या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button