Latest

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; काँग्रेस जिल्हाध्यक्षांना धक्का

backup backup

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रभाव पाहायला मिळाला. विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने सातपैकी सहा जागा जिंकत हुकुमत राखली, मात्र जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी ठरली आहे.

यापूर्वी महाविकास आघाडीतून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर काँग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळे आता एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक ९ , काँग्रेस ५ , भाजप ४, शिवसेना ३ असा निकाल लागला.

निकाल असा…

सोसायटी गटातून वाळवा तालुक्यातील विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील विजयी झाले, हाय व्होल्टेज ठरलेल्या आटपाडीत शिवसेनेचे तानाजी पाटील यांची बाजी मारली, येथे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव झाला. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजी मारली, तासगावमध्ये राष्ट्रवादीचे बी. एस. पाटील विजयी झाले आहेत. कडेगावमधून आमदार मोहनराव कदम पुन्हा जिल्हा बँकेत आले आहेत.

महिला राखीव गटातून काँग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील, राष्ट्रवादीच्या श्रीमती अनिता सगरे यांचा मोठा विजय झाला. इतर मागास प्रवर्गातून काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांचा सलग दुसऱ्यांदा विजयी झाले, राष्ट्रवादीचे मन्सूर खतीब यांनीही बाजी मारली आहे. पतसंस्था गटातून कॉंग्रेचे पृथ्वीराज पाटील, तर भाजपचे राहुल महाडिक विजयी झाले. प्रक्रिया गटातून दिवंगत आर.आर.पाटील यांचे बंधू राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, इतर संस्था गटातून राष्ट्रवादीचे वैभव पाटील विजयी झाले. मजूर संस्था गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि सत्यजित देखमुख विजयी झाले.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT