सांगली जिल्हा बँक निवडणूक : आमदार विक्रम सावंत पराभूत; राज्यमंत्री विश्वजित कदम यांना धक्का - पुढारी

सांगली जिल्हा बँक निवडणूक : आमदार विक्रम सावंत पराभूत; राज्यमंत्री विश्वजित कदम यांना धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्क

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम सावंत यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काट्याच्या लढतीत भाजप पुरस्कृत उमेदवार प्रकाश जमदाडे यांना 45 मते मिळाली तर आमदार विक्रम सावंत यांना 38 मते पडली. दरम्यान, आमदार विक्रम सावंत यांचा पराभव हा राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. जत सोसायटी गटातून त्यांचा पराभव झाला आहे. आमदार विक्रम सावंत यांना ३८ मतं मिळाली आहेत. तर प्रकाश जमदाडे यांना ४५ मतं मिळाली आहेत.

आज सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली. विशाल पाटील ५२१६ मतांनी विजयी झाले आहेत. अजितराव घोरपडे यांना 54  तर विजय विठ्ठल पाटील यांना 14 मतं मिळाली आहेत. जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. वाळवा सोसायटी गट दिलीप तात्या पाटील १०८ मतांनी विजयी झाले आहेत तर भानुदास मोटे यांना २३ मतं मिळाली आहेत.

मिरज सोसायटी गटामध्ये विशाल पाटील (आघाडी) ५२ विजयी झाले तर उमेश पाटील (भाजप) यांना १६ मतं मिळाली. आटपाडी सोसायटी गटात तानाजी पाटील (आघाडी) ४० विजयी झाले. राजेंद्रअण्णा देशमुख (भाजप) यांना २९ मतं मिळाली.  कडेगाव सोसायटी गट मोहनराव कदम (आघाडी) ५३ विजयी झाले. तुकाराम शिंदे (भाजप) यांना ११ मतं मिळाली.  तासगाव सोसायटी गटात
बी. एस. पाटील (आघाडी) ४१ विजयी झाले तर सुनील जाधव (भाजप) यांना २३ ऍड. प्रताप पाटील (अपक्ष) १५ मत मिळाली आहेत.  कवठेमहांकाळ सोसायटी गटात अजितराव घोरपडे (आघाडी) ५४ विजयी झाले. विठ्ठल पाटील (अपक्ष) यांना  १४ मतं मिळाली आहेत.

महिला राखीव गट

अ जयश्री पाटील (आघाडी) १६८८ विजयी
ब अनिता सगरे (आघाडी) १४०८ विजयी
संगीता खोत (भाजप) ५७९
दिपाली पाटील (भाजप) ४०५

अनुसूचित जाती जमाती गट

बाळासाहेब होनमोरे (आघाडी) १५०३ विजयी
रमेश साबळे (भाजप) ५०८

ओबीसी गट

मन्सूर खतीब (आघाडी) १३९५ विजयी
तम्मनगौडा रवी-पाटील ७७२ भाजप

हेही वाचलं का?

Back to top button