सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात शिवसेना आमदाराला अडकवलं; आरोपी अटकेत | पुढारी

सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात शिवसेना आमदाराला अडकवलं; आरोपी अटकेत

मुंबई: देशात सायबर गुन्ह्यांची वाढ होताना दिसत आहे. त्यातून सायबर गुन्ह्यांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ कॉल करून ब्लॅकमेल केल्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये आता थेट शिवसेनेच्या एका आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवान हालचाली करत आरोपी तरुणाला राजस्थानातून अटक केली आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

सातारा जिल्हा बँक निवडणूक : हेवीवेट लढतीत सहकारमंत्र्यांची आठ मतांनी बाजी

मौसमदीन मेव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मौसमदीन मेव याने 20 ऑक्टोबर रोजी रात्री तक्रादार आमदाराला एक महिला बनून मेसेज पाठवला होता. या मेसेजला आमदारानं प्रतिसाद देताच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. संवाद सुरू असताना आरोपीनं महिला बनून आमदाराकडे एक मदत मागितली. आमदारानं देखील मदतीचं आश्वासन दिलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासघाताने आलेले सरकार पाडण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त

थोड्यावेळाने आमदारांना दुसऱ्या एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. ज्यामध्ये मदतीबाबत आमदाराशी त्या महिलेने चर्चा केली. हा व्हिडीओ कॉल झाल्यानंतर आरोपी मौसमदीन मेवने आमदाराला एक अश्लील व्हिडीओ पाठवला. हा अश्लील व्हिडीओ संबंधित आमदाराचा होता. हा व्हिडीओ एडिट करण्यात आल्याचा दावा तक्रारदार आमदारानं केला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं आमदाराला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

Priyanka Chopra : प्रियांका-निक जोनास खरंच घेत आहेत का घटस्फोट?, मोठा खुलासा

हा व्हिडिओ व्हायरल झाला तर समाजात बदनामी होईल या भितीने आमदाराने आरोपीला 5 हजार रुपये पाठवले. आरोपीने दुसऱ्या दिवशीही फोन करत काही पैशांची मागणी केली. आपली मोठी फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर, आमदारानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत राजस्थानातून आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं ब्लॅकमेल करून अनेकांची फसवणूक केली असू शकते असा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.

Back to top button