राज्‍य सरकारने ओबीसी समाजाच्‍या पाठीत खंजीर खूपसला : पंकजा मुंडे | पुढारी

राज्‍य सरकारने ओबीसी समाजाच्‍या पाठीत खंजीर खूपसला : पंकजा मुंडे

मुंबई : पुढारी ऑनलाईन

इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी राज्‍य सरकारची मानसिकताच नाही. राज्‍य सरकारने ओबीसी समाजाच्‍या पाठीत खंजीर खूपसला आहे. प्रत्‍येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका,अशा शब्‍दात भाजप नेत्‍या पंकजा मुंडे यांनी आज राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला. त्‍या पत्रकार परिषदेत बोलत होत्‍या.

इम्‍पोरिअल डेटा कधी गोळा करणार ?

इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. राज्‍य सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवायचे आहे का, शेतकर्‍यांना पीक विमा दिला जात नाही. अतिवृष्‍टीग्रस्‍तांना सरकारने कोणती मदत केली. संकटात असणार्‍या शेतकर्‍यांकडून सक्‍तीची वीजबिल वसुली का सुरु आहे, असे सवालही पंकजा मुंडे यांनी केला.

ठाकरे सरकारमध्‍ये समन्‍वयाचा अभाव दिसून येत आहे. राज्‍य सरकारमध्‍ये विसंवाद असल्‍याने याचा फटका राज्‍यातील सर्वसामान्‍य नागरिकांना बसत आहे, अशी टीकाही त्‍यांनी केली.

हेही वाचलं का?

 

Back to top button