ठाणे

Thane : देवगिरी एक्सप्रेसमधील पाच प्रवाशांकडून एक कोटी जप्त

backup backup

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण स्थानकात देवगिरी एक्स्प्रेसमधून आलेल्या पाच जणांकडून एकूण १ कोटी एक लाख 55 हजार रुपये रेल्वे पोलिसांनी हस्तगत केले आहे. यामध्ये १७८.६८० ग्रॅम सोने देखील जप्त केले आहे. हे पाच जण एका कुरीअर कंपनीत काम करत असल्याचे ते सांगत असून त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आली? याचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

दरम्यान ही रक्कम अवैधरित्या बाळगली असल्याचा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला असून आयकर विभागाला देखील यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. गणेश भगत (वय ४८ रा.नांदेड), मयूर कापडी (वय ४८ रा. भुज), नंदकुमार वैध (वय ४० रा. परभणी) , संजय मनिककामे (वय ५५, रा.नांदेड) व चांदु माकणे (वय ४५ रा. जालना) अशी या पाच जणांची नावे आहेत. (Thane)

गणेश याच्याकडून २० लाख ५० हजार रुपयांची सोन्याची बिस्किटे, मयूर कापडीके यांच्याकडून १६ लाख ९८ हजार रोख रक्कम, नंदकुमार यांच्याकडून रोख रक्कम २७ लाख ५० हजार रुपये जप्त केले. तर संजय माणिककामे यांच्याकडून रोख रक्कम १४ लाख आणि चांदु माकणे याच्याकडून रोख रक्कम २२ लाख ५७ हजार असे एकूण एक कोटी १ लाख ५५ हजार इतकी रक्कम रेल्वे पोलिसांनी जप्त केली.

कल्याण स्थानकात येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अवैध सामान येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ट्रेन मधील संशयितांची चौकशी केल्यानंतर पाच जण संशयितरित्या आढळून आले. यावेळी त्यांची चौकशी केली असता ते एका खाजगी कुरिअर कंपनीत कामाला असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती देताना त्यांनी आम्ही फक्त कुरिअर पोहचविण्याचे काम करत असल्याचे सांगितले. मात्र पार्सलच्या सामानात काय आहे? याची चौकशी रेल्वे पोलिसांनी केली असता हे पाच जण गोंधळलेले दिसले. (Thane)

हा धागा हेरून यांना अधिक चौकशीसाठी फलाट क्रमांक १ येथे नेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे मोठी रक्कम आणि सोने असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास रेल्वे पोलीस करत असून यासंदर्भात आयकर विभागाला देखील कळवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. (Thane)

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT