अबब! नदीकाठी अंघोळ करतानाचं आला मोठा विषारी साप अन् झालं अस (Video) | पुढारी

अबब! नदीकाठी अंघोळ करतानाचं आला मोठा विषारी साप अन् झालं अस (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने अनेकांना नदीत पोहण्याचा मोह आवरत नाही. सध्या अनेक लोक धबधबा असलेल्या ठिकाणी किंवा नदीत पोहायला जात आहेत. अन् त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आपण नदीत पोहायला जावं आणि मोठा विषारी साप आला तर काय करणार ? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये काही लोक नदीकाठी अंघोळ करताना दिसत आहेत. तर एक तरूण मुलगा सेल्फी घेताना दिसत आहे. अन् त्यातच एक मोठा विषारी साप समोर आला. सापाला पाहिल्यानंतर सेल्फी घेत असलेला मुलगा पटकन पाण्याबाहेर आला. पण, तरीही सापाने त्याचा पाठलाग करणे सोडले नाही. शेवटी सेल्फी घेत असलेला मुलगा मोठा दगडाजवळ आला आणि त्याने या सापाचा व्हिडीओ काढला.

 

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर ‘विल्डस्टिक’ नावाच्या अकांऊटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button