Ganguly Warned Umran : भारताकडून डेब्यू करण्यापूर्वीच गांगुलींची उमरानवर ‘दादागिरी’, म्हणाले... | पुढारी

Ganguly Warned Umran : भारताकडून डेब्यू करण्यापूर्वीच गांगुलींची उमरानवर ‘दादागिरी’, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना चकित करणाऱ्या उमरान मलिकने बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी खेळाडू सौरव गांगुलीलाही आपला प्रशंसक बनवले आहे. उमरानचे कौतुक करताना सौरव गांगुली यांनी त्याला एक इशारा वजा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. उमरान हा लांब शर्यतीचा घोडा आहे. त्याने अशीच झंझावाती गोलंदाजी करत आपला फिटनेस कायम ठेवला तर तो भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो, असे म्हटले आहे. (Ganguly Warned Umran)

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) क्रिकेटर उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हैदराबाद संघाला स्पर्धेच्या साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पण या संघाकडून चमकदार कामगिरी करणा-या उमराने भारतीय संघाच्या निवड समितीला आपली दखल घेण्यास भाग पाडले. अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी उमरानची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली. (Ganguly Warned Umran)

उमरानचे भवितव्य त्यांच्याच हातात..

सौरव गांगुलींनी उमरानच्या वेगवान गोलंदाजीचे केवळ कौतुकच केले नाही, तर त्याच्या फिटनेसचीही काळजी घेण्याचा सल्ला दिला. उमरानचे भविष्य त्याच्याच हातात आहे. जर तो तंदुरुस्त राहिला आणि 150+ गतीने गोलंदाजी करत राहिला तर तो भारताकडून दीर्घकाळ खेळेल असे मी निश्चितपणे म्हणू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Ganguly Warned Umran)

उमरान मलिक आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करताना दिसला. त्याने 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि तो आयपीएलमधील दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. नुकतीच त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मायदेशातील टी 20 मालिकेसाठीही भारतीय संघात निवड झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका 9 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत ​​बीसीसीआयने रविवारी 18 जणांचा संघ जाहीर केला. या मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

उमरानच्या आयपीएल 2022 मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने अवघ्या 14 सामन्यांमध्ये त्याने 13.40 च्या स्ट्राईक रेटने एकूण 22 विकेट घेतल्या. मात्र, 9.03 च्या इकॉनॉमीने धावा देऊन तो थोडा महागडाही ठरला. आयपीएलमध्ये उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने तसेच IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करत त्याने 25 धावांत 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Back to top button