“सांडपाणी आणि मनी लाॅण्ड्रिंगचा काय संबंध?”, ईडीच्या चौकशीनंतर अनिल परबांचा सवाल | पुढारी

"सांडपाणी आणि मनी लाॅण्ड्रिंगचा काय संबंध?", ईडीच्या चौकशीनंतर अनिल परबांचा सवाल

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “दापोलीतील साई रिसाॅर्ट हे सदानंद कदम हे आहेत, त्यांनी त्यांची मालकी कोर्टात सांगितलेली आहे. जे रिसाॅर्ट चालूच नाही, त्यावर पर्यावरणाच्या हानीसंबंधी कलमं लावून माझ्यावर केंद्राने तक्रार दाखल केली आहेत. या प्रकरणात ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. जे रिसाॅर्ट चालूच नाही, त्या रिसाॅर्टचं सांडपाणी समुद्रात जातं, यावरून माझी चौकशी करण्यात आली. सांडपाणी आणि मनी लाॅण्ड्रिंगचा काय संबंध?”, असा प्रश्न परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला. अनिल परब यांची ईडीकडून १३ तास चौकशी करण्यात आली.

Back to top button