रेवदंडा; पुढारी वृत्तसेवा : काशिद दुर्घटनेत नऊ वर्षाच्या श्री भायदे या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संपूर्ण भायदे कुटुंबीय आज जिवंत आहे.
वाचा या अवघ्या नऊ वर्षाच्या श्री भायदे यांने कसे वाचवले आपल्या संपूर्ण कुटुंबाचे प्राण.
रविवारच्या रात्री सागर भायदे त्यांची पत्नी शोभा भायदे, मुलगा श्री भायदे आणि नील भायदे पुष्पा सकपाळ यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. गाडी मार्गावर लागली त्यावेळी पावसाचा जोर कमी होता.
संपूर्ण कुटुंबीय या पावसाचा आनंद घेत, चेष्टा मसकरी करत निघाले होते. साधारणपणे रात्री आठच्या सुमारास गाडी काशिदला पोहचली होती.
आता पावसाचा जोर वाढला होता. रस्त्याला दिवेही कमीच होते त्यामुळे काळोख पसरला होता. आतापर्यंत व्यस्थित चाललेली गाडीमध्ये अचानक धाडकन आवाज आला. गाडी पाण्यात असल्याचे जाणवू लागले.
गाडीच्या काचा वर असल्याने काही बाहेरचे काही दिसत नव्हते. जोराचा धक्का बसल्याने गाडीतील सर्वजण जखमी झाले होते.
अधिक वाचा :
मात्र मागे बसलेला नऊ वर्षाचा श्री या धक्क्यातून लगेच सावरला. त्याला काहीतरी भयानक घडल्याची कल्पना आली. त्याने लगेचच गाडीच्या मागील काच बुक्क्या मारुन फोडण्यास सुरुवात केली.
पण, काच काही फुट नव्हती. इतक्यात त्याच्या हाताला एक जड वस्तू लागली. त्याने त्या जड वस्तूने ती काच फोडली.
काच फुटलेल्या त्या मागील खिडकीतून श्री आणि बाकीचे सगळे बाहेर आले. गाडीत पूर्ण पाणी शिरले होते. सर्व कुटुंबीय जखमी असल्याने त्यांना हालचाल करता येत नव्हती.
जवळच एका झाडी फांदी होती. सागर भायदे यांनी सर्वांना त्या झाडाचा आधार दिला. त्यानंतर ते वाचवा वाचवा असे ओरडू लागले. गाडी नदीच्या वाहत्या प्रवाहामुळे दूर आली होती.
अशातच सागर भायदे यांच्या मोठ्या मुलाने किनारा गाठला आणि आरडाओरड सुरु केली. दरम्यान आसपासचे लोक काशिद दुर्घटना झाल्यानंतर कोणी पाण्यात पडले आहे का याची पाहणी करण्यासाठी आले होते.
या लोकांनी आरडा ओरडा होत असलेल्या दिशने धाव घेतली.
अधिक वाचा :
दरम्यान, किनाऱ्यावर आलेल्या श्रीने आपले आई बाबा आणि भाऊ पाण्यात अडकल्याचे सांगितले. मग तेथे जमलेल्या लोकांनी पाण्याच्या दिशेना धाव घेत भायदे कुटुंबीयांना बाहेर काढले.
यानंतर तेथे पोहचलेल्या निलेश घाटवळ, महेंद्र चौलकर यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यानंतर सागर भायदे यांनी निलेश घाटवळ आणि त्यांचे मित्र याचबरोबर काशिद ग्रामस्थांचे आभार मानले.
या संपूर्ण परिस्थिती श्रीने दाखवलेल्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या श्राने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचवले.
हेही वाचले का?
पाहा : उमेद फाऊंडेशनचा वंचित मुलांना निवारा देणार व्हिडिओ