Murud Malshesh Ghat Tourism Pudhari
रायगड

Murud Malshesh Ghat Tourism: मुरबाड-माळशेज घाट: निसर्ग, गडकोट आणि धबधबे पर्यटकांचे आकर्षण केंद्र

सिद्धगड, भैरवगड, पळू-सोनवले लेणी आणि घनदाट जंगलांसह माळशेज घाटा पर्यटनात राज्यभरात प्रसिद्ध; रोमांचक अनुभवासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात

पुढारी वृत्तसेवा

किशोर गायकवाड, मुरबाड

केल्याने देशाटन! पंडित मैत्री सभेत संचार मनुजा! शहाणपण फार!! असे म्हटले जात असे आज बदलत्या युगा बरोबर तसेच धावपळीच्या जीवनात माणूस निसर्गापासून दूर- दूर आहे, त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड, नैराश्य अशा मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणजे घराबाहेर पडून मुरबाड तालुक्यातील निसर्गाच्या डोंगरदऱ्यांच्या सानिध्यात गेले पाहिजे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा निसर्गसंपन्न व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण तालुका आहे. या तालुक्याला ऐतिहासिक परंपरा व सह्याद्रीच्या कडेकपारी यांचा संपन्न भूगोल लाभला आहे. माळशेज घाट, नाणे घाट, तिथबी, म्हसा यात्रा, सिद्धगड गोरखगड भैरवगड, कोकण कडा या ठिकाणी आजही हजारो पर्यटक आपल्या कुटुंबासह भेट देतात. विशेषत: जून, जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांत हजारो पर्यटकांची या पर्यटनस्थळी हजेरी लावली जाते त्यामुळे मुरबाड माळशेज घाट पर्यटनस्थळ आंतरराष्ट्रीय दर्जावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

माळशेज घाट-पूर्वापार देश व कोकण यांना जोडण्याचे काम घाटवाट यांच्या माध्यमातून होत असे दळणवळण व वाहतूक याद्वारे घाटामधून व्यापार चालत असे हीच घाटवाट तिथबी गावावरून माळशेज व पुढे नगर या भागात जाणारे प्रवासी या वाटेतच वाटेचा वापर करत असत त्याच्या सर्व खाणाखुणा आजही दिसून येतात हाच याच माळशेज घाटातून 61 हा राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते अहमदनगर असा करण्यात आला. आज पर्यटकांची पंढरी म्हणून या निसर्गरम्य घाटाकडे पाहिले जाते. येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे रेस्ट हाऊस असून अनेक नामवंत सिनेकलावंत येथे खास विश्रांतीसाठी येतात. माळशेज घाटात अनेक धबधबे असुन पावसाळ्यात त्यांची दुलई येथे पसरली जाते. वनविभागाच्या वतीने अनेक सुविधा येथे उपलब्ध असून मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेनुसार येथे काचेचा स्कायवॉक निर्माण होणार असून माळशेज पर्यटनाला अंतर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार आहे. सुंदर निसर्ग काळू नदीच्या उगम, हिरवाईने गच्च भरलेले मोहक जंगल वन्य प्राणी, प्राणी-पक्षी यांचे दर्शन हा माणसाची वैशिष्ट्‌‍य आहेत. पर्यटनाच्यादृष्टीने माळशेज घाट अत्यंत महत्त्वाचा असून सध्या ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात या माळशेज घाटाचे विशेष महत्त्व दिसून येते तसेच स्थानिकांना प्रमाणात रोजगार प्राप्त होतो.

नाणेघाट-सातवाहन राजांची संपन्न परंपरा असलेल्या नाणेघाट हा 2500 वर्षापासून प्रचलीत राज मार्ग आहे. कल्याण जुन्नर पैठण असा हा मार्ग होता, राष्ट्रीय महामार्ग जवळ वैशाखरे गावाजवळून हा मार्ग जातो तात्कालीन स्थितीत 250 फूट डोंगर शिव पद्धतीने करून काढून हा राजमार्ग बनवण्यात आला. ब्राही लिपीतील 17 शिलालेख पाण्याची टाके विसरण्यासाठी दगडी सभामंडप देवता मंडळ जकातीसाठी दगडी रांजण पारेकर यांच्या चौक या या बाबी असून अनेक पर्यटक व गिर्यारोहक इतिहासप्रेमी येथे भेट देतात. या भागातील जैवविविधता ही समृद्ध स्वरूपाची असून अनेक दुर्मिळ वनस्पती येथे सापडतात.वन विभागाने येथे बाल उद्यान वृक्षलागवड, अशा विविध सोयी सुविधा केल्या आहेत. अनेक दुर्मिळ पक्षी प्राणी येथे दृष्टीस पडतात.

माळशेज घाटात घनदाट धुक्याची चादर पसरलेली असते. त्यात एका बाजूला खोल दरी आणि निमुळता रस्ता यामुळे वाहनचालक, प्रवाशांमध्ये भीतीचे सावटदेखील असते. माळशेज घाटातील रानमेवा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आवळे, आंबे तसेच पावसाळयात रानभाज्या वाहनधारकांचे आकर्षण केंद्र ठरले आहेत. मोरोशी फागुळगव्हाण, थिदवी परिसरात शेकडो महिला-पुरुष रानमेवा विक्री करून आपला उदरनिर्वाह करत असतात. घाटाच्या पायथ्याला थितबी नावाचे आदिवासी गाव वास्तव्यास आहे. इथून वाटाड्या घेतल्यास, थितबी धबधब्यापर्यंत जाता येते हा अनुभव थ्रिलिंग करणारा आहे. धबधब्याच्या खाली मोठा जलाशय असून तिथल्या खोल पाण्यात जलक्रीडेचा मनसोक्त आनंद घेता येतो. माळशेज घाटातील रस्ता वेड्यावाकड्या वळणाचा आहे. घाटात अनेक ठिकाणी पिकनिक पॉईंट उभारण्यात आले आहेत. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या माकडांची झुंबड असते. पावसाळ्यामधील पर्यटकांसाठी घाटात मके, वडापाव, चहा, मॅगी, शेंगदाण्याची मेजवानी असते. मुरबाड शहरातून मटण भाकरी, मच्छी घेऊन माळशेज घाटात वनडे पिकनिकमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

सिद्धगड-नाथांचा गड

सिद्धगड-नाथांचा गड म्हणून सिद्धगड प्रसिद्ध असून सातवां शिलाहार कालखंडाची त्याला परंपरा आहे 1656-57 कालखंडात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असल्याची माहिती मिळते. येथे अनेक लढाया झाल्या असून त्यांचा फारसा इतिहास कोणी अभ्यासला नसल्याचे दिसून येते. गडावर नार मातेचे देव असून अनेक विरघळ, शिला पडलेल्या आहेत. किल्ल्यात पाण्याची टाकी असून किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. किल्ल्याची योग्य जोगी केल्यास किल्ला पर्यटन दृष्ट्‌‍या अत्यंत महत्त्वपूर्ण असे किल्ल्याचे स्वरुप आहे किल्ल्याच्या पायथ्याशीच दक्षिण बाजूला वीर हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या क्रांतिवीरांना देशासाठी लढताना याठिकाणी वीरमरण प्राप्त झाले आहे. बलिदान भूमी म्हणून दरवर्षी दोन जानेवारी रोजी या क्रांतिवीरांना 1946 शाळा पासून मानवंदना दिली जाते सिद्धगड स्मारक समिती यांच्याद्वारे नियोजन केले जाते.

माळशेज घाट फक्त मजेसाठीच

मुरबाड माळशेज घाटात उपप्रदेशिक हायवे पोलीस, आरटीओ तसेच टोकावडा पोलीस ठाण्याचे पोलीस दिवसरात्र पर्यटक, प्रवाशांना सुरक्षा देण्यात व्यग्र असतात. वाहतूक पोलीस अधिकारी विसपुते, पोलीस कर्मचारी संजय घुडे त्यांचे सहकारी त्यांचे काम चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे दुर्देवी घटनांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. माळशेज घाटात काही वर्षांपूर्वी पर्यटकांकडून होत असलेल्या धिंगाण्याला पोलीस आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आळा घातला आहे. त्यामुळे सध्या पर्यटक येथे माळशेज घाटात मौजमजा करण्यासाठीच येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गोरखगड भैरवगड-मुरबाड तालुक्यातील पळू सोनावले लेणी, गिर्यारोहकांसाठी अत्यंत महत्वाची अशी दोन ठिकाणी मुरबाड तालुक्यात असून गोरक्षनाथाची समाधी असलेला गोरखगड व आपल्या विशिष्ट रचनेने लक्ष ठेवून लक्ष वेधून घेणारा भैरवगड सर्वांनाच आकर्षित करून घेत आहे. याठिकाणी व्यवस्था झाल्यास रोजगार निर्मिती व इतिहास अभ्यास यांना चालना मिळेल पळु-सोनवले गणेश येथे गणेश लेणी असून ती ऋषीची समाधी मालमठ कालीन आहेत. प्राचीन रामायण कालीन परंपरा असलेल्या वहात संप्रदायाचे मुख्य ठाणे असणारा असा मालमठ मुरबाड तालुक्यात आहे. येथे शूर ऋषींची समाधी असून सतराव्या शतकात जवळच्या मुकणे राज यांनी मुकणे राजांनी येथे बांधलेल्या सभामंडप आहे. येथे बारामाही विहिरीचे पाणी असून ते कधी कमी होत नाही, हे विशेष महत्त्व! एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून हे ठिकाण ठिकाण रुपास येत आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका नव्हे तर राज्याच्या उंच शिखरावर सध्या मुरबाड माळशेज घाट पर्यटन स्थळे दिसून येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT