पुणे

कडूस- खेड रस्त्यावर बिबट्याचा वावर ; नागरिक भयभीत

backup backup

कडूस ; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस- खेड रस्त्यावर असणाऱ्या कडूस गावातील धाबरशिवार परिसरात मंगळवारी (दि.७) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर बिबट्या फिरताना दिसून आला.

कडूसचे सरपंच निवृत्ती नेहेरे, बाळासाहेब बोंबले, मारुती जाधव यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यासंबंधीचा व्हिडीओ सरपंच निवृत्ती नेहेरे यांनी शूट केला आहे.

नुकताच वडगाव पाटोळे येथे एका साठ वर्षीय महिला बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात ठार झाली हाेती.

ही घटना ताजी असताना कडूस- धायबरशिवार रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने कडूस परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

कडूसच्या पुलाजवळ गावातील काही चिकन सेंटरवाले कोबड्याचे मांस, मृत कोंबड्या, तर काही हाँटेल व्यवसायिक शिळे पदार्थ टाकत असतात.त्या ठिकाणी सतत मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. त्यांना भक्ष करण्यासाठी बिबट्या आला असावा.

या हाँटेलवाल्यांना ग्रामपंचायतने नोटीस द्‍यावी, अन्यथा पुलाजवळ बिबट्याची दहशत वाढण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.

हेही वाचलं का ? 

SCROLL FOR NEXT