Eng vs Ind 4th test day 4 : भारताकडे भक्कम आघाडी, इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८धावांचे लक्ष्य

Eng vs Ind 4th test day 4 : भारताकडे भक्कम आघाडी, इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८धावांचे लक्ष्य
Published on
Updated on

पुढारी; ऑनलाईन डेस्क : Eng vs Ind 4th test day 4 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना कोरोनाचा धोका असूनही सुरू आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. मात्र, सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कसोटी सामना तूर्तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताचा दुसरा डाव सर्वबाद ४६६ धावांवर संपुष्टात आला. याचबरोबर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
उमेश यादव याची विकेट ओव्हरटन याने घेत भारताला दहावा धक्का दिला. उमेशने २५ धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि १ चौकार लगावला.

टीम इंडियाची आघाडी ३५०+ झाली आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराह २४ धावा करून बाद झाला. वोक्सने मोईन अली करवी त्याला झेलबाद केले. संघाची धावसंख्या ४५० असताना टीम इंडियाची ९ वी विकेट पडली.

रिषभ पंतचे अर्धशतक….

रिषभ पंत फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ७ वे अर्धशतक झळकावले आहे. पंतने १०५ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पण अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच तो बाद झाला. मोईन अलीने त्याची विकेट घेतली. १३८ व्या षटकात पुन्हा एकदा फिरकीची जादू कामी आली. पंत षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गोलंदाज मोईन अलीच्या हाती झेलबाद झाला.

शार्दुल बाद…

इंग्लंडच्या गोलंदाजांचा भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी संघर्ष सुरू असताना यजमान संघाचा कर्णधार जो रूटने १३७ वे षटक फेकले. आपल्या पहिल्याच षटकात त्याने यश मिळवत भारताचा सातवा धक्का दिला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद केले. स्लिपमध्ये ओव्हरटन त्याचा झेल पकडला. शार्दुल ठाकूरने ७२ चेंडूत ६० धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार १ षटकार लगावला. यावेळी संघाची धावसंख्या ४१२ होती तर आघाडी ३१३ धांवांची होती. पंत आणि शार्दुलने सातव्या विकेटसाठी 100 धावांची उत्तम भागीदारी केली.

लंचनंतर पुन्हा सामन्याला सुरुवात झाली. शार्दुल ठाकूर-रिषभ पंत जोडीने संयमी खेळ करत. आघाडी वाढवत नेली. १२२ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर शार्दुलने १ धाव काढून भारताची आघाडी २५० पर्यंत पोहचवली.

दरम्यान, चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत टीम इंडियाने ६ विकेटवर ३२९ धावा केल्या आहेत. भारताची आघाडी २३० धावांची झाली आहे. शार्दुल ठाकूर ११ आणि रिषभ पंत १६ धावांवर नाबाद आहेत.

कर्णधार कोहलीचे अर्धशतक हुकले…

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ४४ धावा करून बाद झाला. मोईन अलीने त्याला माघारी धाडले. पहिल्या स्लिपमध्ये क्रेग ओव्हरटनने त्याचा झेल पकडला. मोईन अलीने सहाव्यांदा विराटची विकेट घेतली.

रहाणे बाद….

जडेजा बाद झाल्यानंतर मैदानात उपकर्णधार अजिंक्य रहाणे आला. कोहलीला त्याची साथ मिळेल अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. ख्रिस वोक्सने १०४ व्या षटकात भारताला पाचवा धक्का दिला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर रहाणे पुन्हा एकदा गोंधळलेला दिसला आणि आत येणाऱ्या चेंडूवर एलबीडब्यू बाद झाला. त्याला शुन्यावरच तंबूत परतावे लागले.

जडेजा बाद…

१०२ व्या षटकात भारताला चौथा धक्का मिळाला. ख्रिस वोक्सने रवींद्र जडेजाला षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद केले. जडेजाने डीआरएस घेतला पण तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय योग्य असल्याचे घोषीत केले.

कोहलीच्या प्रथम श्रेणीच्या १० हजार धावा पूर्ण…

विराट कोहलीने ९९ व्या षटकात रॉबिन्सनविरुद्ध तीन धावा काढून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. विराटचा हा १२८ वा प्रथम श्रेणी सामना आहे. कर्णधार कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर आपल्या १००० कसोटी धावा पूर्ण केल्या.

रोहितचे दमदार शतक

भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत शतक ( १२७ ) ठोकले. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने ६१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची दमदार भागीदारी रचली. अखेर ऑली रॉबिन्सनने रोहित आणि चेतेश्वर पुजाराला एकाच षटकात बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने भारताला २७० धावांपर्यंत पोहचवले.

अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी विराट २२ तर जडेजा ९ धावा करुन नाबाद राहिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news