पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॉम्प्युटर 'हॅक' झाला, बँकेचे खाते 'हॅक' झाले, फेसबुक अकाऊंट 'हॅक झाले…अशा असंख्य तक्रारी पोलिसांच्या सयाबर सेलकडे येतात; मात्र 'माझा मेंदूच 'हॅक' झालाय ओ' अशी तक्रार घेऊन एक उच्च शीक्षित तरुणी पोलिसांच्या सायबर सेलकडे आली आणि पोलिसही चक्रावून गेले.
त्याचे झाले असे, पुण्यातील एका नामांकित लष्करी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेस तिचा मेंदू काेणीतरी हॅक केल्याचे आणि तिच्या मनता जे विचार येतात त्याचप्रमाणे वेगवेगळया कृती घडत असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तिने थेट सायबर पाेलीस ठाणे गाठत पाेलीसांसमोर कैफियत मांडली.पाेलीसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या 'माईंड हॅकिंग'च्या तक्रारी सायबर पाेलीसांकडे वाढू लागल्याने पाेलीस अधिकारी, कर्मचारी चक्रावून गेले आहेत.
असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. एका २५ वर्षीय उच्च शिक्षित तरुणाची पबजी गेम खेळताना एका तरुणीशी ऑनलाईन ओळख झाली. दाेन महिने तो तिच्या संर्पकात होता. नंतर तिच्याशी बाेलणे बंद झाले; परंतु त्यानंतर तिला काही सांगयचे तर ती माेबाईलवर पाॅप करुन गाणी पाठवते, तिचा फाेटाे माेबाईल स्क्रीनवर सातत्याने दिसताे, ती वारंवार त्रास देते, असे भास तरुणाला हाेऊ लागले आणि त्याने याबाबत पाेलीसांकडे धाव घेत या गाेष्टीचा तपास करा अशी मागणी लावून धरली.
अशाप्रकारात लेखी तक्रार दे असे पाेलीसांनी सांगताच नेमके काेणते मुद्दे तक्रारीत द्यावे हे तरुणास समजेना झाले. दरम्यान, पाेलीसांनी तरुणाचा फाेन, फेसबुक तपासून पाहिला, तर ताे काेणी 'हॅक' केला नसल्याचे ही स्पष्ट झाले. याचप्रकारे एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला त्याची पत्नी माेबाईलवर काही मेसेज करत असेल, तर ते ऑफीस मधील इतरांना आपाेआप समजतात, माझ्यावर काेणीतरी लक्ष ठेवून आहे, माझे काेणाला चांगले बघवत नाही असे भास हाेऊ लागले आणि त्यानेही सायबर सेल गाठले.
सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक डी. हाके म्हणाले, 'माइंड हॅकिंग'च्या तक्रारीच्या केसेस वाढत असल्याचे जाणवते; परंतु अशाप्रकारात संबंधित व्यक्तींचे समुपदेशन सायबर पाेलीस कर्मचारी, अधिकारी करत आहेत. संबंधित व्यक्तींना लेखी तक्रार द्या, असे सांगितले तर नेमके काेणा विराेधात तक्रार द्यायची, हे त्यांना समजून येत नाही. मानसाेपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या असे आम्ही त्यांना सूचवताे. एकटेपणा, माेबाईल, लॅपटाॅपचा अतिवापर, आत्मकेंद्री वागणे, याचा परिणाम संबंधितांवर झाल्याचे जाणवत असून, त्यांनी कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी मनमाेकळया संवाद साधणे गरजेचे आहे.
हेही वाचा