महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने सादर केलेल्या 'आतल्या गाठी' या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत जल्लोष करताना विद्यार्थी. Pudhari
पुणे

Purushottam Karandak SP College: ‘आवाज कोणाचा… एसपी कॉलेजचा!’ पुरुषोत्तम करंडकावर एसपीवाल्यांचे नाव कोरले

महाअंतिम फेरीत ‘आतल्या गाठी’ची बाजी; ‘ठोंग्या’ ठरली सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका

पुढारी वृत्तसेवा

पुणे : 'पुरुषोत्तम करंडक कोणाचा; एसपीवाल्यांचा,' 'आमचं नाटक आम्ही बसवतो,' 'आवाज कोणाचा एसपी कॉलेजचा,' 'आले रे आले एसपी आले', अशा घोषणांनी भरत नाट्य मंदिरात तरुणाईच्या विजयाचा, जल्लोषाचा आवाज घुमला आणि चैतन्यमय वातावरणाची अनुभूती आली.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने सादर केलेल्या 'आतल्या गाठी' या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी करंडक रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नाॅलॉजीने सादर केलेल्या 'ठोंग्या' या एकांकिकेला मिळाला. संघास रोख रुपये चार हजार एक, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. 26 ते दि. 28 डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण 17 संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 28) सायंकाळी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष सुहास जोशी, परीक्षक चंद्रशेखर ढवळीकर, संजय पवार, अमित फाळके मंचावर होते. स्पर्धेचा निकाल अ‍ॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला. सांघिक द्वितीय आलेल्या 'ग्वाही' या एकांकिकेस श्रीराम करंडक तर सांघिक तृतीय आलेल्या 'काही प्रॉब्लेम ये का?' या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

सांघिक प्रथम : आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे)

सांघिक द्वितीय : ग्वाही (देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)

सांघिक तृतीय : काही प्रॉब्लेम ये का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे)

सर्वोकृष्ट प्रायोगिक करंडक : ठोंग्या (फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी).

वैयक्तिक पारितोषिके (भूमिका - एकांकिकेचे नाव)

सर्वोकृष्ट अभिनय : पुरुषोत्तम नारायण गाडगीळ करंडक : अभिषेक हिरेमठस्वामी (पोस्टमन- ग्वाही)

अभिनय नैपुण्य : पुरुष : दिशा फाऊंडेशन करंडक : पार्थ पाटणे (विनायक - ग्वाही)

अभिनय नैपुण्य : स्त्री : अक्षरा बारटक्के (मंगला - ग्वाही)

सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य : विश्वास करंडक : शाश्वती वझे (जुई - आतल्या गाठी)

सर्वोकृष्ट दिग्दर्शक : चैतन्य प्रणित करंडक : अद्वय पूरकर, शाश्वती वझे, समर्थ खळदकर (आतल्या गाठी)

अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके : नाव (भूमिका- एकांकिका- महाविद्यालय)

ओंकार कापसे (प्रतीक, काही प्रॉब्लेम ये का?, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)

आस्था काळे (दृष्टी, काही प्रॉब्लेम ये का?, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)

प्रांज्वळ पडळकर (वामन, वामन आख्यान, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)

संयोगिता चौधरी (अश्विनी, सोयरिक, आर्ट्स, कॉमर्स, अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, नागठाणे)

तन्मय राऊत (विजय, अस्तित्व, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

अजित देसाई (विठ्ठल, जाळ्यातील फुले, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

गायत्री शिंदे, (मुक्ता-मुलगी, तुकारामाची टोपी, फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी)

रेणुका साळुंके (सोनी, जिव्हाळा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छ. संभाजीनगर)

स्वप्निल घोडेराव (पारंपरिक बुजगावणं, बुजगावणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर)

मानस एलगुंदे (ओमी, स्वधर्म, श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती)

चिकाटी सोडू नका : मोहन जोशी

नाट्य क्षेत्रात करिअर घडवायचे असल्यास चिकाटी सोडू नका. जास्तीत-जास्त मेहनत करा. तरुणांचे प्रश्न समजण्यासाठी राजकारण्यांनी पुरुषोत्तमच्या रंगमंचावरील एकांकिका पहाव्यात.

परीक्षण करताना आमची परिस्थिती 'कभी खुशी कभी गम' अशी होती. सादरीकरणात विषयांचा तोचतोचपणा सुरुवातीस जाणवला. त्यानंतर मात्र, तरुणांचे प्रश्न मांडणार्‍या, स्थानिक विषयांना हात घालणार्‍या एकांकिका सादर झाल्या. राजकारण्यांनी या स्पर्धेतील एकांकिका पाहाव्यात, जेणेकरून युवा पिढीचे अनेक प्रश्न त्यांना समजतील. परंतु, नाट्यगृहातील खुर्ची सत्तेची नसल्यामुळे स्पर्धेतील एकांकिका पाहण्यास राजकारणी येतील की नाही? असा प्रश्न आहे. महाअंतिम फेरीत सादर झालेल्या सर्व एकांकिकांमध्ये उत्तम तालीम, उत्तम नियोजन, उत्तम तांत्रिक बाजू, कलाकारांची प्रचंड मेहनत प्रकर्षाने जाणवली.
चंद्रशेखर ढवळीकर, परीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT