Pomegranate Price: डाळिंबाला किलोला विक्रमी ६०० रुपये भाव; पुणे बाजारात नवा उच्चांक

साताऱ्यातील शेतकऱ्याच्या भगवा डाळिंबाला मिळाला इतिहासातील सर्वाधिक दर
Pomegranate Price
Pomegranate PricePudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाने विक्रमी भाव गाठत नवा इतिहास रचला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावचे शेतकरी सचिन आबाजी देवकर यांच्या शेतातील भगवा डाळिंबाला प्रतिकिलो ६०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला.

Pomegranate Price
Pune Tourist Places Crowd: पर्यटकांच्या गर्दीने पुण्यातील पर्यटनस्थळे फुलली; वाहतूक कोंडीने वाढला त्रास

विशेष म्हणजे एका डाळिंबाचे वजन तब्बल ८०० ग्रॅम होते. देवकर यांच्या शेतातून सुमारे ४०० किलो डाळिंब विक्रीसाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दाखल झाले. त्यापैकी ३६ किलो डाळिंबाला ६०० रुपये इतका भाव मिळाला.

Pomegranate Price
Women Hockey Tournament: पश्चिम विभागीय हॉकीत मुंबई, संभाजीनगर, ग्वाल्हेर संघांची दमदार आगेकूच

विक्रमी दर मिळाल्यानंतर शेतकरी सचिन देवकर म्हणाले की, सहा एकर शेतीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन घेत आहोत. सेंद्रिय खतांचा वापर करण्यास प्राधान्य दिल्याने दर्जेदार उत्पादन हाती आले आहे.

Pomegranate Price
Hadapsar Woman Murder: भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेच्या खुनाचा प्रयत्न

त्यामध्ये, मिळालेल्या विक्रमी भावामुळे आमच्या मेहनतीचे चीज झाले असल्याचे देवकर यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news