नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल राज वैभवजवळ बुधवारी (दि. ८) पहाटे ६ वाजेच्या दरम्यान संगमनेरहून नारायणगाव ओलांडून पुण्याच्या दिशेला निघालेली मारुती वॅगनआर गाडी पोटचारीवरील पुलाच्या कठड्याला धडकून खाली कोसळून अपघात झाला. यामध्ये पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणगाव येथील भोसले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी धुके असल्याने गाडी चालकाला पुलाचा कठडा दिसून न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रोहन लहाडे, विशाल उबाळे, प्रतिक जाधव, राजकुमार जयस्वाल, गोकुळ जाधव, (वय २० ते २३ वर्ष, रा. वाकड पुणे) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण संगमनेरहून पुण्याच्या दिशेला निघाले होते. नारायणगाव ओलांडून पुढे पुण्याच्या दिशेला जाताना हॉटेल राज वैभव जवळ असणाऱ्या पोट चारीच्या पुलाला धडकून वॅगनआर (एमएच १४ जेई १२९) गाडी पुलाखाली कोसळली. या अपघातात मारुती गाडीचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला.
हेही वाचा