उत्तर महाराष्ट्र

जळगावमध्ये २९ लाख रुपयांची फसवणूक, एक अटकेत

backup backup

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे प्रलोभन दाखवत तोतयेगिरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांपैकी एकाला रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने अटक केली. अंकित गोवर्धन भालेराव (मुक्ताईनगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जानेवारी २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत २९ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रकमेचा हा गुन्हा आहे.

अमोल प्रदीप चौधरी (रा. वसई वेस्ट) या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाने फसवल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवत फसवल्याप्रकरणी अंकित गोवर्धन भालेराव सध्या रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात आहे.

अधिक वाचा : 

वैभव राणे असे खोटे नाव सांगून अंकित गोवर्धन भालेराव याने अमोल प्रदीप चौधरी यास ४ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

याशिवाय हेमंत सुभाष भंगाळे (हातगाडी चालक) यांची ४ लाख रुपयात, पुर्वा ललित पोतदार या गृहीणीची ७ लाख ३० हजार, देवेंद्र सुभाष भारंबे (भुसावळ) यांची २ लाख ४० हजार. नितीन प्रभाकर सपके (जळगाव) रा. आनंदनगर मोहाडी रोड या कॉन्ट्रॅक्टरची १२ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : 

अंकित गोवर्धन भालेराव, त्याची बहिणा स्वाती गोवर्धन भालेराव, आई रत्नमाला गोवर्धन यांनी फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

या तिघांना तोतयेगिरी करुन खोटे नाव सांगून फसवणूक केल्याप्रकरणी संशयीत आरोपी करण्यात आले आहे.

यातील अंकित भालेराव यास अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा : 

उर्वरीत दोघांचा शोध घेण्यास सुरू आहे.

पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक बिरारी पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT