नांदगांव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदार छगन भुजबळांना भिडले : येथील पुरग्रस्त पाहणीनंतर आढावा बैठकीत विकास निधीवरुन पालकमंत्री छगन भुजबळ व नांदगांवचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात विकास निधी वरुन शाब्दिक चकमक उडाली.
आमदार सुहास कांदे यांनी तत्काळ आपतकालीन विकास निधी द्या अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. यावरून भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत आहो आमदार साहेब थांबा हो म्हणाले. यानंतरही सुहास कांदे अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
कांदे म्हणाले की, साहेब अम्हाला आपत्कालीन निधी पाहिजे त्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्या. यांनतर पुन्हा भुजबळ यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत सांगितले की, आहो थांबा, यावर विचार करुन बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल.
मात्र सुहास कांदे यांचा आक्रमकपणा कायम राहिल्याचे दिसून आले. ते म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने फोन करा.
यानंतर पुन्हा भुजबळ यांनी याला काही चौकटी आहेत, त्याच्याबाहेर जाता येत नाही. अधिकाऱ्यांना काही मर्यादा आहेत जरा थांबा आपण सांगू, पण त्यांनी नाही केले मग? या ख़डाजंगीनंतर आमदार सुहास कांदे शांत झाल्याचे दिसून आले.
मात्र ही खडाजंगी पूर्णत: कॅमेरासमोर चालू असल्याने सर्वजण ऐकत होते.
हे ही वाचलं का?