saki naka rape : ‘निर्भया’ प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती! महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवला | पुढारी

saki naka rape : ‘निर्भया’ प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती! महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : saki naka rape : दिल्‍लीतील निर्भया प्रकरणाच्या कटू आठवणी जाग्या करणारी घटना मुंबईच्या साकीनाका परिसरात घडली. पतीपासून विभक्‍त राहणार्‍या एका 32 वर्षांच्या महिलेवर तिच्याच परिचित मित्राने अमानुष मारहाण करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवला.

तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय असून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. जखमी महिलेवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

हत्येच्या प्रयत्नासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

महिलेवर लैंगिक अत्याचार झाला की नाही याचा खुलासा होऊ शकला नाही. मेडिकल रिपोर्टनंतर ही बाब उघडकीस येईल. मात्र साकीनाका (saki naka rape)पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविल्याचे एसीपी मुकुंद पवार यांनी सांगितले. 32 वर्षांची ही महिला साकीनाका येथील खैरानी रोडवरील फूटपाथवर राहते.

शुक्रवारी मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजता या महिलेस एक व्यक्‍ती बेदम मारहाण करीत असल्याची माहिती एका नागरिकाने मुंबई पोलिसांना दिली.

घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांना खैरानी रोडवरील एच. जी. स्टुडिओजवळील पार्क केलेल्या टेम्पोमध्ये ही महिला गंभीर अवस्थेत दिसून आली.

रक्‍तस्राव होत असल्यामुळे तिला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ती बेशुद्धावस्थेत आहे. स्थानिक रहिवाशांच्या जबानीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. तसेच लैंगिक अत्याचाराच्या कलमांत वाढ केली.

संबंधित महिलेचा मेडिकल रिपोर्ट अद्याप पोलिसांना मिळाला नाही. तो आल्यानंतर लैंगिक अत्याचाराबाबत स्पष्टता होणार आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताला शुक्रवारी दुपारी साकीनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने चौकशीसाठी
ताब्यात घेतले आहे.

चौकशीत त्याने आपल्या कृत्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

यांसदर्भात बोलताना एसीपी मुकुंद पवार यांनी सांगितले की, दिल्लीतील निर्भया घटनेनंतर महिलेच्या गुप्त भागांवर दुखापत दिसून आल्यास लैंगिक अत्याचाराचे कलम वाढविण्यात येते.

त्यामुळे या गुन्ह्यांतही पोलिसांनी लैंगिक अत्याचाराची नोंद केली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button