नाशिक

Ganeshotsav Nashik : साडेपाचशे गणेश मंडळांचे परवानगीसाठी अर्ज, २३२ मंडळांना परवानगी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत ५४१ मंडळांनी महापालिकेच्या एक खिडकी योजनेअंतर्गत परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यातील २३२ मंडळांना परवानगी मिळाली असून, ३०९ मंडळांचे अर्ज प्रलंबित आहेत.

संबधित बातम्या :

येत्या १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा होत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बहर आला आहे. गणेश मंडळांची देखावे, आरास उभारण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे. मंडप, आरास उभारण्यासाठी एक खिडकी योजना राबविली जात आहे. गणेशोत्सवाला आता आठवडाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिल्याने गणेश मंडळांच्या परवानगी प्रक्रियेला वेग आला आहे. शहरातील विविध भागांतून आतापर्यंत ५४१ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यांपैकी २३२ मंडळांना परवानगी मिळाली. उर्वरित मंडळांचे अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत. शहरात तुलनेत सातपूर विभागातून सर्वाधिक १२० मंडळांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी ४३ मंडळांना परवानगी मिळाली आहे. पंचवटीतील ११५ पैकी ८६, नवीन नाशिकमधील १०४ पैकी ४८, नाशिक पश्चिम विभागातील ७८ पैकी २०, नाशिक पूर्वमधून ६० पैकी १४, तर नाशिकरोड विभागातील ६४ अर्जांपैकी २१ अर्ज मंजूर झाले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT