TIME World’s Best Companies of 2023 | ‘टाइम’च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या टॉप १०० मध्ये ‘इन्फोसिस’ | पुढारी

TIME World's Best Companies of 2023 | 'टाइम'च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या टॉप १०० मध्ये 'इन्फोसिस'

पुढारी ऑनलाईन : ‘टाइम’ (TIME Magazine) मासिकाच्या २०२३ च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत टॉप १०० मध्ये इन्फोसिस या एकमेव भारतीय कंपनीचा समावेश करण्यात आला आहे. बंगळूर स्थित जागतिक सल्लागार आणि आयटी सेवा कंपनी इन्फोसिस ८८.३८ च्या एकूण स्कोअरसह ७५० जागतिक कंपन्यांमध्ये ६४व्या स्थानावर आहे. (TIME World’s Best Companies of 2023)

संबंधित बातम्या

दरम्यान, टाइमच्या यादीत पहिल्या टॉप ४ मध्ये सर्व मोठ्या टेक आहेत आणि त्या अमेरिकेतील आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ॲपल (Apple), अल्फाबेट (गुगलची मूळ मालकी असलेली कंपनी) आणि मेटा (Meta Platforms) या कंपन्यांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्ट ९६.४६ स्कोअरसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर अॅपल, अल्फाबेट, मेटा अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. अ‍ॅसेंचर, फायजर, अमेरिकन एक्स्प्रेस, बीएमडब्ल्यू ग्रुप, डेल टेक्नॉलॉजीस या कंपन्यांही टॉप १० मध्ये आहेत.

जगात अव्वल कामगिरी करणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करताना टाइमने कर्मचाऱ्यांचे समाधान, महसूल वाढ आणि शाश्वतता अथवा पर्यावरणीय, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स आदी पैलू विचारात घेतले.

इन्फोसिसला टाइम वर्ल्डच्या सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या २०२३ च्या यादीत स्थान देण्यात आले आहे. आम्ही टॉप ३ जागतिक व्यावसायिक सेवा फर्ममध्ये आहोत आणि टॉप १०० जागतिक क्रमवारीत भारतातील एकमेव ब्रँड आहे, अशी माहिती इन्फोसिसने X ‍‍‍वर पोस्ट करत दिली आहे.

Infosys ही टॉप १०० मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी आहे. त्यासोबतच या यादीतील टॉप ३ व्यावसायिक सेवा कंपन्यांपैकी एक आहे. ज्यात Accenture आणि Deloitte या अन्य दोन कंपन्यांचा समावेश आहे.

या कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, इन्फोसिसची स्थापना १९८१ मध्ये झाली होती. Infosys ही NYSE वर सूचीबद्ध असलेली जागतिक सल्लागार आणि IT सेवा कंपनी आहे. कंपनीत ३ लाख ३६ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. (TIME World’s Best Companies of 2023)

हे ही वाचा :

Back to top button