Sharad Pawar : साखर उद्योगाच्या एकत्रित माहितीचा ग्रंथ अभ्यासावा : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : साखर उद्योगाच्या एकत्रित माहितीचा ग्रंथ अभ्यासावा : शरद पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : साखर उद्योगात माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी अनेक वर्ष काम केले आहे. साखर धंद्याबाबतच्या इतिहासाची संपूर्ण एकत्रित माहिती असलेला ग्रंथ त्यांनी तयार केलेला असून तो मी चाळलेला आहे. साखर अभ्यासकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे अशी अपेक्षा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. मांजरी येथील व्हीएसआयच्या कार्यालयात शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर सह संचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल – साखर उद्योगाची भरारी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सकाळी करण्यात आले.

संबंधित बातम्या :

Pune News : शरद पवार, अजित पवार एकाच व्यासपीठावर; व्हीएसआय संचालक मंडळाची आज पुण्यात बैठक

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशानंतर बोलताना शेखर गायकवाड म्हणाले साखर उद्योगाविषयी पहिल्यांदाच संपूर्णपणे एकत्रित माहिती असलेले पुस्तक आहे. सुमारे पाच हजार वर्षाचा इतिहासाची माहिती तीन वर्षे अभ्यासून त्यामध्ये इस्तंबूत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जागतिक साखर उद्योग, साखरेचे उपपदार्थ, साखर उद्योगाची स्थित्यंतरे आणि भविष्याचा वेध त्यामध्ये आम्ही घेतलेला आहे असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

शेंडी-पोखर्डीच्या गौराई लढाईवर दुष्काळाचे सावट!

अपात्रता सुनावणीवरून शिंदे-ठाकरे गटांत कलगीतुरा

नाशिक-पुणे महामार्गावरील पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य कायम!

Back to top button