उत्तर महाराष्ट्र

corruption : कळवणमध्ये २५ हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

backup backup

कळवण, पुढारी ऑनलाईन : खरेदी केलेल्या शेतजमिनीचे ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत (corruption) प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

एसीबीच्या नाशिक युनिटने कळवण येथे कारवाई केली आहे. तलाठी जयवंत कांबळे यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, १८ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. खरेदी केलेल्या शेतजमिनी चे ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी ओतूर येथील तलाठी जयवंत कांबळे यांनी ३० हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाचेची मागणी पंचासमक्ष केली.

या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ लाचलुचपत (corruption) प्रतिबंधक विभाग नाशिक, सापळा पथकातील पो. ना नितीन कराड, पो. ना प्रभाकर गवळी, पो. ना प्रवीण महाजन व पो. ना शरद हेंबाडे सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक. यांनी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. सुनील कडासने, यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

पहा व्हिडीओ : गणपतीची सुंदर वस्त्रे आणि आभूषणे तयार करणारा सातारचा अवलिया

SCROLL FOR NEXT