Mumbai Curfew : गणेशोत्सव काळात मुंबईत जमावबंदी

मुंबई गणेशोत्सव : गणेशोत्सव काळात मुंबईत जमावबंदी
मुंबई गणेशोत्सव : गणेशोत्सव काळात मुंबईत जमावबंदी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Mumbai Curfew कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव काळात शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दर्शन अथवा मुख दर्शन घेण्यास बंदी घातली असून या आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

गणेशोत्सव काळात गर्दी होऊन कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासन आणि प्रशासकीय स्तरावर प्रयन्त केले जात आहेत.

अशातच सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाबाबत शासनाने नवीन आदेश जारी करत फक्त ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दर्शन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त (अभियान) एस. चैतन्य यांनी शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दर्शन अथवा मुख दर्शन घेण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.

गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या काळात शहरात कलम 144 लागू करत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास आणि मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news