नवी दिल्ली,पुढारी वृत्तसेवा : कोरोना नियंत्रणासाठी नाकावाटे लस प्रतिक्षित असून या लसीच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील परीक्षणाला लवकरच दिल्ली एम्समध्ये सुरुवात केली जाणार आहे.
हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीकडून नाकावाटे दिली जाणारी लस विकसित केली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगातील अन्य काही देशांमध्ये नाकावाटे दिल्या जाणार्या लसीवर संशोधन सुरू आहे.
भारत बायोटेकच्या इन्ट्रानॅसल लसीच्या दुसर्या टप्प्यातील परीक्षणाला गेल्या ऑगस्ट महिन्यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने येत्या काही दिवसांत दिल्ली एम्समध्ये नाकावाटे दिल्या जाणार्या लसीच्या परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याचे समजते.
यासंदर्भात एम्सच्या एथिक्स कमेटीकडे अर्ज सादर करण्यात आलेला आहे. चार आठवड्यांच्या फरकाने स्वयंसेवकांना दोनवेळा लस दिली जाईल.
अडेनोव्हायरल इन्ट्रानॅसल बीबीव्ही १५४ ही अशा प्रकारची पहिलीच लस आहे.
नाकावाटे दिल्या जाणार्या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी १८ ते ६० वयोगटातील स्वयंसेवकांवर करण्यात आली होती.
त्यात लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे दिसून आले होते.
दुसर्या टप्प्यातील परीक्षण पार पडल्यानंतर तिसर्या टप्प्यातील परीक्षणांना सुरुवात केली जाणार आहे.
ही माहिती विज्ञान अणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आली.
विशेष म्हणजे दिल्ली एम्समध्येच २ ते १८ वयोगटातील मुलांसाठीच्या कोवॅक्सिन लसीचेही परीक्षण सुरू आहे.
कोव्हिड-19 साठी मुलांचे लसीकरण करण्यावरून भारतात बरीच चर्चा झाली. विशेषतः शाळा सुरू करण्याची पूर्वअट या अंगाने ही चर्चा झाली. परंतु, सर्वप्रथम आपण जगभरातील स्थिती पाहू. जून 2021 च्या अखेरीस जवळजवळ 170 देशांमध्ये कमी-अधिक क्षमतेने वा मर्यादेने शाळा सुरू झाल्या होत्या. तथापि, 12 वर्षांखालील मुलांचे लसीकरण कोणत्याही देशात अद्याप सुरू झालेले नाही.
हेही वाचा :