संग्रहित छायाचित्र.  
मराठवाडा

हिंगोली : हळद शिजवणाऱ्या कुकरच्या स्फोटात चार जण जखमी ; एक गंभीर

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामध्ये हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत ४ जण गंभीररित्या जखमी झाले. शनिवारी रात्री कहाकर बुद्रुक येथे ही घटना घडली. चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथे देवराव पोपळघट यांच्या शेतात हळद शिजवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संदीप पोपळघट यांनी त्यांच्या मालकीचे कुकर शेतात आणले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवराव पोपळघट, संदीप पोपळघट, अजय अमृता खंदारे व कांबळे, असे चौघेजण यासाठी काम करत होते. त्यांनी कुकरमध्ये हळद व पाणी टाकले. कुकरखाली जाळ पेटवला.

मात्र, यावेळी कुकरवर असलेली शिट्टी लॉक झाल्यामुळे वाफ बाहेर पडण्यास जागाच राहिली नाही. त्यामुळे काही वेळानंतरही कुकर तापला नाही, असे गृहीत धरून चौघेही कुकरपासून काही अंतरावर जेवणासाठी बसले. अर्धा तासापेक्षा अधिक काळ होऊन देखील शिट्टी झालीच नाही. अद्याप कुकरमधील पाणी तापले नाही, असे समजून चौघेही निवांत जेवण करीत बसले. मात्र, कुकरमध्ये वाफेचा दाब येऊन कुकरचा स्फोट झाला. यामध्ये कुकरच्या तीनही टाक्या उडून बाजूला पडल्या. कुकरमधील गरम पाणी व हळद या चौघांच्या अंगावर पडली. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले.

दरम्यान शेतामधून मोठा आवाज झाल्याने परिसरातील शेतकरी धावत घटनास्थळी गेले. त्याठिकाणी चौघेजण गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत दिसून आले. या चौघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये कांबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवले. दोघे जण अकोला, तर एकास वाशीमला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT