कात्रज दूध संघ निवडणूक : जिल्हा दूध संघासाठी चुरशीने ८५ टक्के मतदान | पुढारी

कात्रज दूध संघ निवडणूक : जिल्हा दूध संघासाठी चुरशीने ८५ टक्के मतदान

पुणे ; पुढारी वृत्तसेवा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत चुरशीने ७०९ पैकी ६०९ (८५.९० टक्के) मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी दिली.

वेल्हा तालुक्यातील मतदान शंभर टक्के झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्हा दूध संघातील १६ पैकी ५ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. कात्रज मुख्यालयात मावळ, मुळशी, पुरंदर, हवेली आणि वेल्हा तालुक्यातील मतदान सुरू असून अन्य मतदान संबंधित तालुक्यात होत आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत झालेली मतदान स्थिती पुढीलप्रमाणे : 

आंबेगाव ४८ पैकी ४६, भोर ७० पैकी ६६, दौंड ८० पैकी ७०, जुन्नर १०९ पैकी ९१, खेड १०६ पैकी १०५, शिरूर १६८ पैकी १२३, मावळ २१ पैकी १८, मुळशी १५ पैकी ९, पुरंदर ४१ पैकी ४०, हवेली ३२ पैकी २२, वेल्हा १९ पैकी १९ मतदान पूर्ण झाले आहे. दरम्यान, कात्रज मुख्यालयात मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सोमवारी (दि.२१) सकाळी कात्रज मुख्यालयात सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button