नाशिक : तिसगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार ; दृश्य कॅमेऱ्यात कैद | पुढारी

नाशिक : तिसगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार ; दृश्य कॅमेऱ्यात कैद

शिंदवड, पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथील संदीप वसंतराव भालेराव यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने (leopard) हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रा ठार झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तिसगाव येथील भालेराव परिवार दिवसभर शेतातील कामे आवरुन रात्री जेवण करुन झोपी गेले होते. रात्री ११:३० च्या सुमारास संदीप भालेराव यांना कुत्र्याच्या साखळीचा आवाज आला आणि खिडकी उघडून बघितले. तर, बिबट्या कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे दिसून आले; पण यावेळी आवाज झाल्याने बिबट्याने धूम ठोकली. थोड्यावेळाने ठार केलेला कुत्रा ओढून नेण्यासाठी बिबट्या  (leopard) पुन्हा तेथे आला.

यावेळी भालेराव यांनी बिबट्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. बिबट्याचा वावर काही दिवसांपासून तिसगाव व परिसरात दिसून येत आहे. रात्री शेतात कांदे, द्राक्षबागांना पाणी देण्याचे काम सुरु असते. यातच बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरा लावून देखील बिबट्या मात्र अजुनपर्यंत पकडण्यात यश आलेले नाही. पिंजरे वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

 

Back to top button