सेनेने ‘एमआयएम’शी जुळवून घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही : चंद्रकांत पाटील | पुढारी

सेनेने 'एमआयएम'शी जुळवून घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही : चंद्रकांत पाटील

जळगाव पुढारी वृत्तसेवा : शिवसेना राष्ट्रवादी व कॉग्रेस बरोबर गेली त्याच वेळेस शिवसेना संपली आहे, आता काय एमआयएम हे सॉफ्ट टार्गेट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्याशी कधीच बाळासाहेब ठाकरेंचे जमले नव्हते, त्यांच्यावर ते नेहमीच जहाल टीका करीत असत. आज जरी शिवसेना एमआयएमशी आघाडी करणार नाही म्हणत असले तरी, त्यांनी ‘एमआयएम’शी जुळवून घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही, असा टाेला  भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्‍यमांशी बाोलताना लगावला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्‍हणाले, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतरही आमच्या मनात त्यांच्याविषयी आदरच आहे. भाजपमधून जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्‍यांची समजूत काढत हाेताे; पण त्यांनी ऐकले नाही. ते पार्टी सोडून गेल्यावर आम्ही त्याच्यावर टीकाटिपण्णी करीत नाही. त्‍याचप्रमाणे त्‍यांनीही टीकाटिपणण्‍णी करू नये. हे त्यांनी पाळले पाहिजे, मात्र ते जेष्ठ आहेत त्यांना जे वाटेल ते करतील, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

जनतेची करमणूक आमच्या वाक्याने होते की नाही हे माहीत नाही. मात्र तुमच्या कृत्याने जनतेची झोप उडाली आहे,  असेही चंद्रकात पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button