पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार सुजय विखे पाटील यांची मुलगी अनिषाने भेट घेतली.
पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नातीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा हट्ट वडील खासदार सुजय विखे- पाटील यांच्याकडे केला. तो सुजय विखे पाटलांनी आज पूर्ण केला. अनिषा विखे -पाटील हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठीचा वडील सुजय विखे- पाटील यांच्या ई-मेल वरुन मेल पाठवला.
"मी अनिषा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय" असा ई-मेल तिने पाठवला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफीस मधून उत्तर आले. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात मेलवर रिप्लाय आला. त्यात भेटण्याची वेळे नमूद केली होती. मोदींनी भेटण्याचा अनिषाचा हट्ट पुरवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार सुजय विखे पाटील यांची मुलगी अनिषाने भेट घेतली.खासदार सुजय विखे-पाटील सहकुटुंब नरेंद्र मोदींना भेटले. मोदींनी अनिषाला खायला चॅाकलेट दिले, मग दोघांच्या गप्पा रंगल्या. अनिषानं पंतप्रधानांच्या समोर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही इथे बसता का? हे तुमचं ॲाफीस आहे? यावर हे माझं कायमचं ॲाफीस नाही. तू आली म्हणून तुझ्या भेटीला आलो. मी तर तुझ्याशी गप्पा मारायला आलोय." अशी उत्तरं नरेंद्र मोदींनी अनिषाला दिली.
नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत तोवर अनिषानं पुन्हा प्रश्न विचारल," तुम्ही गुजरातचे आहात का ? मग तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? यावर मोदी हसले. यानंतर लगेच खासदार सुजय विखेंनी अनिषाला थांबवलं. नरेंद्र मोदींनी ५ ते ७ मिनिट अनिषाशी मन मोकळेपणानं गप्पा मारल्या.
या भेटी दरम्यान आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील, तसेच त्यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील उपस्थित होत्या.
हे पाहा :
नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची 'फोनाफोनी'!!
https://www.youtube.com/watch?v=r-lG9gBXOsA
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.