Maharashtra Politics 
Latest

Maharashtra Politics : “पार्टी बदलली म्हणून….” : रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लातूर येथे आज (दि.१८) झाले. यावेळी विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी वडिलांच्या आठवणीने उजाळा देत आपले काका दिलीपराव देशमुख यांच्या नात्याबद्दल बोलत असताना भावूक झाले. हा व्हिडिओ शेअर करत रोहीत पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, "आठवणी या कधीही विसरता येत नाहीत आणि कुणी पार्टी किंवा विचार बदलले म्हणून त्या पुसूनही टाकता येत नाहीत." (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : कुणी पार्टी किंवा विचार बदलले म्हणून…

शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी आपल्‍या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "भाऊ-भाऊ आणि काका-पुतणे यांच्या नात्यातील पदर माझे मित्र अभिनेते रितेश देशमुखजी यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत उलगडले. हे ऐकत असताना त्यांचा खरंच हेवा वाटला! आठवणी या कधीही विसरता येत नाहीत आणि कुणी पार्टी किंवा विचार बदलले म्हणून त्या पुसूनही टाकता येत नाहीत. 'सर्वांनीच' हे समजून घ्यायला हवं! काहीजण या आठवणींकडं सहज दुर्लक्ष करत असेल तरी अनेकांसाठी मात्र त्या लढण्यास प्रेरणा देत असतात." ही पोस्ट करत रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या सोशल मिडियावर व राजकीय वर्तुळावर चर्चा होवू लागली आहे.

रितेश देशमुख : काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे…

रोहीत पवारांनी पोस्ट करत एक व्हिडिओ लिंक शेअर केली आहे. यामध्ये रितेश देशमुख म्हणतं आहेत की, "कधीही कोणासोबत देखील बोलताना वैयक्तिकरित्या टीका करु नये. आजकाल राजकारणात कोणत्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होतं. जो महाराष्ट्र अशा दिग्गज नेत्यांनी गाजवला,त्यांच्या भाषणांनी गाजवला. तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही. तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे'.

यावेळी त्यांनी आपले वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की," दुसरी गोष्ट म्हणजे, साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा लातूरला आले तेव्हा मांजरा साखर कारखान्यावर त्यांचा सत्कारचा कार्यक्रम होता. तेव्हा साहेब देवळात गेले  गेले. पहिल्यांदा स्टेजवर गेले आणिदादांच्या पायावर डोकं टेकवलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि भाषण सुरु केलं. भाषण सुरु केल्यानंतर साहेब गहिवरले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एवढी लोकं ऐकत होती सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. काय पुढे करायचं कोणाला माहिती नव्हतं कारण साहेब बोलत नव्हते. त्यावेळेस काका उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले 'कम ऑन यू कॅन डू इट…' एका भावाने दुसऱ्या भावासोबत कसं वागलं पाहिजे हे उदाहण येथेच आहे..'

एका भावाने दुसऱ्या भावाबरोबर कसं वागलं पाहिजे याच उदाहरण येथे आहे. भाऊ म्हणूनसाहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं. आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो हिच भावना या दोघांमध्ये होती, साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली…' हे म्हणत रितेश देशमुख भावूक झाले. पुढे बोलताना ते म्हणाले, 'साहेबांची उणीव नेहमीच भासते. पण ही उणीव कधी भासू नये म्हणून काका कायम सोबत उभे राहिले. गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे… यासाठी कायम काका सोबत राहीले. काकांना बऱ्याच वेळा बोलता आलं नाही. पण आता सर्वांसमोर सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर आहे.'" (Maharashtra Politics)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT