Nagar : सुषमा अंधारे यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न | पुढारी

Nagar : सुषमा अंधारे यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयात वकील बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी यापूर्वी देव-देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याने त्यांना न्यायालयात येण्यास विरोध करण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी त्यांच्यावर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी न्यायालयात गोंधळ उडाला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी संवाद यात्रा शनिवारी नगरमध्ये दाखल झाली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे दुपारी जिल्हा न्यायालयात वकील बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना मनसेच्या पदाधिकारी अ‍ॅड. अनिता दिघे यांनी प्रचंड विरोध केला. सुषमा अंधारे यांनी यापूर्वी हिंदू देव-देवतांवर टीका केली.

अशा व्यक्तीला आमचा विरोध आहे. तसेच, शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता आष्टेकर यांनीही विरोध केला. न्यायालयात आरडाओरडा सुरू झाल्याने तत्काळ भिंगार कॅम्प पोलिसांनी धाव घेतली. महिला पोलिसांनी पुढे जावून दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी स्मिता आष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी वकिलांशी अर्धा तास संवाद साधला आणि त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. दरम्यान, न्यायालयात गोंधळ होऊनही रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.

हेही वाचा

Back to top button