Latest

मढी देवस्थानच्या वेबसाईटमध्ये छेडछाड ! मढी देवस्थानच्या वेबसाईटवर ‘सीईओ’ पवारांकडून बदल

अमृता चौगुले

मढी : पुढारी वृत्तसेवा :  मढी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार कामावर हजर होताच, मढी देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर बदल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मढी देवस्थानच्या सचिव विमल नवनाथ मरकड यांच्यासह नऊ विश्वस्तांच्या सहीने पवार यांना सेवा समाप्तीचा आदेश देण्यात आला आहे. विश्वस्त मंडळाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, अशोक पवार यांच्याकडे मढी देवस्थानचे मुख्याधिकारी पद आहे. देवस्थानच्या कर्मचार्‍यांचे देखरेख व नियंत्रण असते. असे असताना 17 जानेवारी 22 ते 10 सप्टेंबर 23 दरम्यान विना परवानगी अनाधिकृतपणे कुठलाही रजेचा अर्ज न देता ते कामावर गैरहजर होते.
पवार यांच्या गैरहजेरीमुळे देवस्थान समितीच्या दैनंदिन व प्रशासकीय कामकाजामध्ये अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. त्यांनतर हजर होताना गैरहजेरी बाबतचा खुलासा केलेला नाही.

संबंधित बातम्या : 

कामावर हजर झाल्यानंतर देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद असलेल्या पदाधिकार्‍यांच्या नावांमध्ये बदल करताना मढी देवस्थानची वेबसाईट न वापरता स्वतःचा खासगी वैयक्तिक ई-मेलचा वापर करून हा बदल घडवून आणल्याने विश्वस्तांनी अशोक पवार यांना सेवा समाप्तीचा आदेश दिला आहे. यावर नऊ विश्वस्तांनी पवारांवर देवस्थानच्या वेबसाईटची छेडछाड केल्याच्या कारणावरून त्यांची सेवा तत्काळ थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगार न्यायालयात पवारांच्या बाजूने निकाल
मढी देवस्थान समितीचे कर्मचारी अशोक पवारांकडून मागील काळात देवस्थान समितीचा कारभार मनमानी पद्धतीने केल्याचा विश्वस्त मंडळ व पवारांच्या वाद झाले. सध्याही कार्यरत विश्वस्त मंडळाने देवस्थानचा कारभार हाती घेतल्यानंतर पवार व पदाधिकार्‍यांमध्ये वाद झाले. यानंतर पवार धर्मादाय आयुक्तांकडून कामगार न्यायालयात गेले. तेथे पवार यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर कामावर हजर झाले. मात्र, पवार यांनी स्वतःचा ई-मेल आयडी वापरल्याने नवा वाद उभा राहून विकासकामे कमी आणि विश्वस्त व कर्मचारी आपापसातील वाद सुरू झाला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT