Parineeti-Raghav Pre wedding : राघव-परिणीतीच्या विवाहाची जय्यत तयारी | पुढारी

Parineeti-Raghav Pre wedding : राघव-परिणीतीच्या विवाहाची जय्यत तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा दोघे २४ सप्टेंबर रोजी उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. (Parineeti-Raghav Pre wedding) आता राघव यांच्या दिल्ली येथील घरी प्री-वेडिंगची जोरदार तयारी सुरु झालीय. मीडिया रिपोर्टनुसार, राघव यांच्या दिल्ली येथील घर सजवले जात आहे. त्याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. एका पापाराझीने पोस्ट केलेल्या माहितीनुसार, परिणीतीचे मुंबईतील घरदेखील सजलेले आहे. वृत्तानुसार, दिल्लीमध्ये लग्नापूर्वीचा उत्सव पारंपरिक सोहळा सुरू झाला आहे. या सोहळ्यामध्ये ‘आरदा’, प्रार्थना आणि ‘शब्द कीर्तन’, भक्तिगीत गायन यांचा समावेश असेल. (Parineeti-Raghav Pre wedding)

राघव आणि परिणीती यांचे दोन्ही कुटुंबीय विवाह सोहळ्याच्या तयारीला लागले आहेत. रिपोर्टनुसार, या कपलने दोन्ही कुटुंबीयांसाठी क्रिकेटचा सामनादेखील आयोजित केला आहे. लग्नात ब्रायडल पोशाखाची थीम स्टायलिश ब्ल्यू ऊटफिट ठेवण्यात येईल. परिणीती चोप्राची बहिण प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती मेरी आणि निक जोनाससोबत या लग्नाला उपस्थित राहील. लीला पॅलेस, उदयपूर येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे.

 

Back to top button