Ganeshotsav : मोदींनी दिल्या गणेशोत्सवाच्या मराठीत शुभेच्छा | पुढारी

Ganeshotsav : मोदींनी दिल्या गणेशोत्सवाच्या मराठीत शुभेच्छा

पुढारी वृत्तसेवा : “गणपती बाप्पा मोरया”, “मोरया, मोरया” च्या गजरात देशभरात बाप्पाच आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वेगवेगळ्या भाषेत गणेशउत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत मराठीतूनही शुभेच्छा दिल्या आहेत.

Ganeshotsav : सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या रांगड्या मराठमोळ्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाची प्रतीक्षा आबालवृद्धांना वर्षभर लागून असते. यंदाच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा संपली असून, मंगलमय सोहळ्यास आजपासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ खात्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा फोटो शेअर केला आहे व पोस्ट करत मराठीतूनही शुभेच्छा दिल्या आहेत.  त्यामध्ये त्यांनी म्हटल आहे की, “सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!”

हेही वाचा

Back to top button