नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात होणारी गर्दी, त्यामुळे उदभवणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत सिटीलिंक शहर बसेसच्या वाहतूक मार्गांत पोलिस प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार बदल करण्यात आले आहेत.
संबधित बातम्या :
अधिसूचनेनुसार १९ ते २८ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ६ नंतर वाहतूक मार्गांतील बदल अमलात येणार आहेत. यात मार्ग क्रमांक १०१ – निमाणी ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक १०२ बी – तपोवन ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक १०३ ए – निमाणी ते सिम्बाॅयोसिस कॉलेज, मार्ग क्रमांक १९४ – सुकेणा ते सिम्बाॅयोसिस कॉलेज, १११ – निमाणी ते म्हाडा कॉलनी, ११६- तपोवन ते बारदान फाटा, १२७ ए – तपोवन ते चुंचाळे गाव, १२८ ए – निमाणी ते चुंचाळे गाव. १३१ए – तपोवन ते गिरणारे, २४५- नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर, २४५ ए नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर या मार्गावरील सर्व बसफेर्या या निमाणी – दिंडोरी नाका – पेठ फाटा – मखमलाबाद नाका – गंगापूर नाका व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच शहरात येताना या बसेस अशोकस्तंभापर्यंत नियमित मार्गाने व पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका – पेठ नाका – दिंडोरी नाका व निमाणीमार्गे मार्गस्थ होतील.
मार्ग क्रमांक १०४ तपोवन ते पाथर्डी गाव, मार्ग क्रमांक १०४एस –निमाणी ते शरयूनगर, १०६ ए – निमाणी ते अमृतानगर, १०७ ए – निमाणी ते अंबड गाव, १०९ ए – तपोवन ते सिम्बाॅयोसिस कॉलेज, १३७ – निमाणी ते जातेगाव या मार्गावरील सर्व बसेस निमाणी येथून जुना आडगाव नाका – पंचवटी डेपो कॉर्नर- कन्नमवार पूल – द्वारका – सारडा सर्कल – गडकरी चौक मार्ग जाऊन पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच शहरात येताना या बसेस अशोकस्तंभपर्यंत नियमित मार्गाने व पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका – पेठ नाका – दिंडोरी नाका व निमाणीमार्गे मार्गस्थ होतील. मार्ग क्रमांक १०८ नवीन सीबीएस ते सुकेणा, मार्ग क्रमांक १३२ – नवीन सीबीएस ते सायखेडा, मार्ग क्रमांक मार्ग क्रमांक १३३ – नवीन सीबीएस ते सय्यद पिंप्री, मार्ग क्रमांक १४४ – नवीन सीबीएस ते मोहाडी, मार्ग क्रमांक १५२ – नवीन सीबीएस ते पिंपळगाव बसवंत, मार्ग क्रमांक १६०ए – नवीन सीबीएस ते कोचरगाव मार्ग क्रमांक १६३ – नवीन सीबीएस ते भुजबळ नॉलेज सिटी, मार्ग क्रमांक १४७ – नवीन सीबीएस ते मोहाडी सदरील मार्गांवरील सर्व बसेस सायंकाळी ६ नंतर निमाणीपासून सुटतील व निमाणी पर्यंत येतील.
मार्ग क्रमांक १२९ ए – निमाणी ते भगूर, मार्ग क्रमांक १३०ए – निमाणी ते भगूर, मार्ग क्रमांक १४६ ए – निमाणी ते सिन्नर, मार्ग क्रमांक १४८ ए – निमाणी ते भैरवनाथनगर, मार्ग क्रमांक १६६ ए – निमाणी ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन, मार्ग क्रमांक २०८- ओझर बस स्टँड ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २१० – दिंडोरी ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २४३ – बोरगड एअरफोर्स गेट ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २४४ – बोरगड ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन, मार्ग क्रमांक २४७ – मोहाडी स्टँड ते नाशिकरोड डेपो, मार्ग क्रमांक २६० – मखमलाबाद ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २६३ – भूजबळ नॉलेज सिटी ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २६६ ए – तपोवन ते नाशिकरोड या मार्गावरील सर्व बसेस निमाणी येथून जुना आडगाव नाका – पंचवटी डेपो कॉर्नर- कन्नमवार पूल – द्वारका व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तर नाशिकरोड कडून येतांना द्वारका – सारडा सर्कल – गडकरी चौक – सीबीएस – अशोकस्तंभापर्यंत पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका, पेठ नाका, दिंडोरी नाका व निमाणी मार्गे मार्गस्थ होतील. मार्ग क्रमांक २०१ – नाशिकरोड ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक २०२, २०३, २११, २३८, २४२ या मार्गावरील बसेस नाशिकरोडकडून येताना द्वारका – सारडा सर्कल – गडकरी चौक व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच जाताना सिव्हिल – मोडक सिग्नल – गडकरी चौक – सारडा सर्कल व चौक व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील.
हेही वाचा :