पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक तरुण बेरोजगारीला सामोर जाव लागलयं. आता संरक्षण मंत्रालयान भरती काढली आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी ची संधी मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने सी / ओ 56 एपीओ च्या 41 फील्ड दारूगोळा डेपोमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 458 रिक्त जागा भरती करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अधिसूचनेच्या तारखेपासून 21 दिवसांपर्यंत म्हणजे 30 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी, बारावी, पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष पेक्षा जास्त नसावं.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18000 ते 92,300 रुपये पगार मिळणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार या संकेतस्थळासाठी अधिकृत अर्ज indianarmy.nic.in या संकेतस्थळावर भरुन खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात.
पत्ता- कमांडंट, 41 फील्ड दारूगोळा डेपो, पिन – 909741.
पद संख्या
ट्रेड्समन 330
जेओए (एलडीसी) 20
मटेरिअट असिस्टंट 19
एमटीएस 11
फायरमॅन 64
255 (आई) एबीओयू ट्रेड्समन मेट 19