पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज रिपाई पुणे महापालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हा पुतळा पुणे महापालिकेच्या नवीन वस्तारीत इमारतीच्या दर्शनी भागात बसवण्यात येणार आहे.
त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पालिकेला आंबेडकरांचा पुतळा भेट देण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी त्यांनी पुणे महापालिकेत रिपाई भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवले असे सांगितले.
अधिक वाचा :
ते म्हणाले "रिपब्लिकन पक्षाचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही.'
रामदास आठवले पुढे म्हणाले की, 'आम्ही आगामी महापालिका निवडणूक भाजपसोबत आणि त्यांच्याच चिन्हावर लढवणार आहोत. विधानसभेची निवडणूक मात्र वेगळ्या चिन्हावर भाजपसोबत राहून लढवू आणि आमचे आमदार निवडून आणू"
याचबरोबर रामदास आठवले म्हणाले, 'जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक असून, त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे, हे निश्चित करणे सोयीचे होईल.
त्यामुळे सर्वाना न्याय देता येईल. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न राज्यशासनाच्या अख्त्यारीत येतो. मात्र मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना आरक्षणाचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे.'
ते पुढे म्हणाले की, 'या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा अधिकार राज्यांना देण्याचा ठराव संसदेत पारीत करावा, असे निवेदन पंतप्रधान मोदी यांना दिले आहे.'
अधिक वाचा :
'आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळाल्यास संबंधित राज्ये आरक्षणाचे प्रश्न सोडवतील. शिवाय आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण मिळेल," असेही आठवले म्हणाले.
पवारांना बळीचा बकरा करू नये
'ज्येष्ठ नेते शरद पवार हे धोकेबाज नाहीत. त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी मला कधीही धोका दिला नाही. ते देशाचे नेते आहेत.' असे रामदास आठवले म्हणाले. ते 'राष्ट्रपती पदाचे उमेदवार पवार असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, देशात भाजप आणि मित्रपक्षाचे सर्वाधिक आमदार व खासदार असल्याने पवार निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच कोणी बळीचा बकरा करू नये.' असे वक्तव्य केले.
दरम्यान, रामदास आठवलेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महापौरांकडे सुपूर्द केला.
त्यावेळी महापौरांसह उपमहापौर सुनिता वाडेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, रिपाइंचे ज्येष्ठ नेते एम.डी शेवाळे, शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदींसह रिपाइंचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : यम भाईने कशा खाल्या लाथा
https://youtu.be/0r76elg4NLE