रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईक बुकिंग मिनिटात झाले फूल

रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईक बुकिंग मिनिटात झाले फूल
Published on
Updated on

 
[visual_portfolio id="8490"]

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईक तयार करणाऱ्या कंपनीने आपली आरव्ही ४०० ही इलेक्ट्रिकल बाईक विक्री करणेसाठी आज ऑनलाईन स्लॉट ओपन केला. हा स्लॉट अवघ्या काही मिनिटातच बूक झाला अशा माहिती कंपनीने दिली.

रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईक यांनी आपल्या बाईकसाठी जवळपास चार महिने वेटिंग सुरु आहे असे सांगितले. कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

ते आपल्या ग्राहकांना लवकरात लवकर बाईक देण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईक ने दिल्ली, मुंबई, पुणे, चन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरासाठी आपल्या बाईकचे बुकिंग ओपन केले होते.

अधिक वाचा :

पहिल्या लॉटलाही बंपर प्रतिसाद

गेल्या महिन्यात रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईकला चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेल्या महिन्यात दोन तासात रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईक ची ५० कोटींची विक्री झाली होती.

रिव्होल्ट आरव्ही ४०० ही बाईकमध्ये ३ किलो वॅट ( मिड ड्राईव्ह ) मोटर आहे. तसेच ७२ वॅट, ३.२४ किलो वॅट प्रतितास लिथियम आयन बॅटरी यात समाविष्ट आहे.

तसेच हा बाईकचे टॉप स्पीड ८५ किलोमिटर प्रतितास इतके आहे. ही इलेक्ट्रिकल बाईक माय रिव्होल्ट अॅप द्वारे संचालित होते.

यामध्ये बाईक लोकेटर, कस्टमाईज साऊंड, संपूर्ण बाईकचे निदान, बॅटरीची स्थिती, पूर्वीचा डाटा आणि कापलेले अंतर या फिचर्सचा समावेश आहे.

अधिक वाचा :

याचबरोबर जवळ असणाऱ्या रिव्होल्ट स्विच स्टेशनचीही माहिती या अॅपद्वारे मिळणार आहे. जेणेकरुन बाईकस्वार आपली बॅटरी बदलून पुढच्या प्रवासाला लागेल. ही बॅटरी बदलण्यास फक्त ६० सेकंद लागणार आहेत.

रिव्होल्टने पहिल्यांदाच ट्रॅकिंग सिस्टम वापरली

रिव्होल्ट इंटेलकॉर्प यांनी नुकतेच नवीन व्होल्ट नावाची सर्विस सुरु केली आहे. ही सर्विस गाडीबाबतची ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टम आहे.

या सर्विसनुसार बाईक खरेदी करणारा त्यांची बूक केल्यापासून ती डिलिव्हर होईपर्यंत बाईक ट्रॅक करु शकतो. अनेक ई कॉमर्स बेवसाईट या सर्विसेस ऑफर करत आहेत.

पण रिव्होल्ट इलेक्ट्रिकल बाईक ने ही व्यवस्था गाड्यांच्या क्षेत्रात पहिल्यांदाच आणली आहे.

या संकल्पनेमागे ग्राहकापर्यंत त्याची इलेक्ट्रिकल बाईक पोहचेपर्यंत संपूर्ण पारदर्शकपणा ठेवण्याची कल्पना आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा जोकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news