गणेश जेठे; पुढारी वृत्तसेवा : तळकोकण तसो शिवसेनेचा बालेकिल्लो आसा. शिवसेनेची मदार तशी तळकोकणातील संघटनेवर आसा. भाजपने आता जा नारायण राणे हेंका मंत्रिपद दिला आसा ता कोकणातल्या शिवसेनेक टक्कर देवसाठी दिला आसा असा समजला जाता. पण शिवसेनेच्या नेत्यांनी यावर कडवी प्रतिक्रिया दिली आसा.
शिवसेना म्हणजे काय आसा ह्या आम्ही राणेंका दाखवून दिला हा. तेंचो दोन-दोनवेळा पराभव केलंव आसव. लोकसभा निवडणुकीतही दोनयेळा तेंका शिवसेनेन धूळ चारली आसा. असो पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हेंनी केलो आसा.
अधिक वाचा
राणे हेंका मंत्रीपद दिला म्हणजे शिवसेनेक धक्को बसतलो असा जर भाजपाक वाटत आसात तर ता भाजपवाल्यांचा स्वप्नच ठरात असा शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत हेंनी म्हटला हा.
स्वतः नारायण राणे हेंनीसुद्धा दिल्लीत तेथल्या पत्रकारांशी बोलताना शिवसेना माझ्याशी काय टक्कर देणार? असो प्रश्न उपस्थित करून आपणाक शिवसेनेशी लढण्यासाठी मंत्रिपद दिला नाय आसा तर माझा आजपर्यंतचा काम, अनुभव बघून दिला आसा. त्यामुळे माझ्या खात्याचा काम चांगला होवचा ह्याच माझा उद्दिष्ट आसतला, असा सांगून टाकल्यानी.
राणे हेंका मंत्रीपद मिळाल्यानंतर कोकणातील राजकारणात सध्या जोरदार घडामोडी सुरू झाले आसत. भाजपवाल्यांका जरा ताकद मिळाली आसा.
राणे हेंचो चिरंजीव आमदार नितेश राणे हेंनी वेंगुर्ल्याच्या एका कार्यक्रमात शिवसेना-भाजप युती झाली तर चांगला आसा, असे उद्गार काढले.
अधिक वाचा
तेंच्या ह्या उद्गाराक खासदार विनायक राऊत यांनी तेथल्या व्यासपीठावरच आमदार नितेश राणे हेंची पाठ थोपटली. त्यामुळा युती होतली की नाय? अशी चर्चा सुरू झाली आसा. मात्र तसा काय होवचा नाय, असा आमदार वैभव नाईक हेंनी म्हटला आसा.
राणेंशी शिवसेना कधी युती करुचीच नाय असा जाहीर करून टाकल्यानी आसा. पालकमंत्री उदय सामंत हेंनी मात्र युतीचो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतले असा सांगून मोकळे झाले आसत.
माजी खासदार निलेश राणे हेनी तरी युती करूची अशी भाजपच्याच कार्यकर्त्यांची इच्छा नाय आसा, असा स्पष्ट केल्यानी हा.
सध्याची परिस्थिती बघता युती काय होवची नाय, पण उगाच आपला राजकारण सुरू झालेला दिसता आसा.
काय पण आसांदे, पण राणे केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यामुळा कोकणची ताकद केंद्रात वाढली आसा आणि कायतरी विकास होयत अशी आशा कोकणी माणसाका वाटू लागली आसा.
हे ही वाचलतं का?
https://youtu.be/0r76elg4NLE