मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई मधील चार महत्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी फोनमुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt), भायखळा, दादर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन आला. या फोननंतर संबंधित ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. या ठिकाणांची पोलिसांनी तातडीने कसून तपासणी केली.
ज्या फोनवरुन कॉल आला तेथे पोलिसांनी लगेच संपर्क साधला. पण मला मिळालेली माहिती मी तुम्हाला दिली आहे, एवढेच सांगून त्या व्यक्तीने फोन स्विच ऑफ करुन ठेवल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने चार ठिकाणी शोधशोध केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई, येथून ९.४५ वाजता एक कॉल प्राप्त झाला. csmt मुंबई येथे घातपात करण्यात येणार आहे, असे त्यावरुन सांगण्यात आले.
सदर कॉलच्या अनुषंगाने लागलीच csmt रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रं ०१ ते १८, DRM कार्यालय आणि परिसर, सेंट जॉर्ज गल्ली परिसर, धन्यवाद गेट परिसर, १८ नं पार्किंग आणि प्लॅटफॉर्म पार्किंग परिसराची श्वान पथकाच्या मदतीने तपासणी केली. पण कॉलप्रमाणे कोणतीही संशयी वस्तू तेथे आढळून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पण या कॉलमुळे पोलिसांची धावपळ उडाली. तसेच संबंधित ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली.
हे ही वाचा :