Latest

माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

दीपक दि. भांदिगरे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माजी बॅडमिंटनपटू अर्जुन पुरस्कार विजेते नंदू नाटेकर यांचे पुण्यात वृद्धफकाळाने निधन झाले आहे. ते ८८ वर्षाचे होते. नंदू नाटेकर हे जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी बजाविणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते.

१९६१ मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार पहिल्यांदा प्राप्त करण्याचा मान नाटेकर यांना मिळाला होता. भारताबाहेर विजेतेपद मिळवणारे ते पहिले बॅडमिंटन खेळाडू आहेत.

६० च्या दशकात ते एकाचवेळी एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन प्रकारांमध्ये खेळत होते.

अफलातून सातत्यासाठी नाटेकर यांना 'गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन' अशी उपाधी देण्यात आली होती.

ते स्पोर्टस अँड फिटनेस (एनएसएफ) चे संचालक होते. त्यांनी १५ वर्षाच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात १७ राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे.

६ एकेरी, ६ दुहेरी, ५ मिश्र दुहेरी स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

सांगलीत जन्म झालेल्या नाटेकरांचं मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण झालं आहे. त्यांचा मुलगा गौरव नाटेकर टेनिस स्पर्धेत सात वेळा भारतीय राष्ट्रीय चॅम्पियन आहे.

प्रतिस्पर्धी खेळाडूला उद्देशून नाटेकर यांनी कधीही वाचाळपणा केला नाही. त्यांनी आपल्या रॅकेटने प्रत्युत्तर दिलं.

नंदू नाटेकर यांनी आपल्या अद्भुत खेळाने भारतामध्ये बॅडमिंटन खेळाची दखल घ्यायला लावली होती.

सध्याच्या तरुण बॅडमिंटनपटूंना नंदू नाटेकर यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.

नंदू नाटेकर म्हणजे बॅडमिंटनचं विद्यापीठच आहे. आताचे खेळाडू एकेरी किंवा दुहेरी असा एकच पर्याय निवडतात.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT