Latest

मंत्रालयात दारुच्या बाटल्या; त्रिमूर्तीच्या मागील बाजूस पडला खच

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन: मंत्रालयात दारुच्या बाटल्या आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयात दारुच्या बाटल्या आढळल्याचे वृत्त एका खासगी वृत्तावाहिनीने प्रसिद्ध केले.

त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या मंत्रालयात या बाटल्या आल्या कुठून असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सर्वसामान्यांना तपासणी शिवाय सहजासहजी प्रवेश न मिळणाऱ्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याचे समोर आले आहे.

मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंततर एकच खळबळ उडाली असून, मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना व तपसाणी केली जात असातनाही, एवढ्या दारूच्या बाटल्या आल्या कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरेकर यांची टीका

हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच, 'महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी.'

'दारूच्या बाटल्या मंत्रालायामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,

संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे.

या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे.

हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे.

धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विक्रेतयांसाठी करतंय, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टॉरंट वाल्यांसाठी काम करत आहे,

की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय हे एकदा जनतेला कळलं पाहिजे.' असेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT